अबब! एक उंदीर मारायला ३ हजार रूपयांचा खर्च…

१ कोटी ५१ लाख रुपयांत फक्त ५ हजार उंदीर मारले, पश्चिम रेल्वेत उंदरांचा उच्छाद

Mumbai

पश्चिम रेल्वेला एका उंदीर मारायला 3 हजार रुपयांच्या खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षात उंदीर नियंत्रण मिळविण्यासाठी 1 कोटी 51 लाख 41 हजार रुपये खर्च करुन, फक्त 5 हजार 457 उंदीर मारल्याची धक्कादायक माहिती दैनिक ‘आपलं महानगर’च्या हाती लागली आहे. या उंदारांनी मांडलेल्या उच्छादामुळे केवळ रेल्वेचे प्रवासीच नाहीतर रेल्वे प्रशासनही चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

भारतीय रेल्वे सध्या उंदरांच्या उच्छादामुळे त्रस्त आहे. रेल्वे गाडया, स्थानके, रेल्वेच्या कारशेडमध्ये उंदरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे रेल्वेचे दरवर्षी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी आणि उंदरांवर नियंत्रणाचे रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. यासंबंधी रेल्वे बोर्डाने मागदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांनी या तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र काटेकोर पध्दतीने या सुचनांची अंमलबजावणी होत,नसल्याची बाब समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या तीन वर्षांत उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी 1 कोटी 51 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र इतके रुपये खर्च करूनही पश्चिम रेल्वेला फक्त 5457 उंदीर मारण्यात यश आले आहे. त्यामुळे खर्च जास्त पण उंदीर कमी अशी सध्या पश्चिम रेल्वेची अवस्था झाली आहे.

जवळ जवळ पश्चिम रेल्वेला एक उंदीर मारण्यासाठी 2 हजार 800 रुपये इतका खर्च पडला आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली की,उंदीर मारण्यासाठी खर्चची सरासरी काढणे कठीन आहे.औषदानी मृत्यू पावलेल्याची संख्या आहे. मात्र जे उंदीर दुसरीकडे जाउुन मुत्युपावले त्यांच्या हिशोब लावण्यात येत नाही. त्यामुळे हे बोलू शकत नाही की या उंदरांना पकडणे 3हजार रुपये खर्च आला आहे.

उंदीर मिळालाच नाही

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या शासकीय रेल्वे कॉलनीत उंदरांच्या नियंत्रणासाठी तब्बल 83 हजार 358 रुपये खर्च करण्यात आला आहे. हा खर्च 2017 ते 2019 दरम्यान करण्यात आला आहे. उंदरांच्या नियंत्रणासाठी रेल्वेकडून ‘रेटॉल रेट केक’ चा वापर करण्यात येतो. मात्र तीन वर्षात 83 हजार रुपये खर्च करुनसुध्दा एकही उंदीर मारण्यात रेल्वेला यश आले नाही. रेल्वे कॉलनीत मारलेल्या उंदरांची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे पश्चिम रेल्वेने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर सांगितले आहे.

उंदरांसाठी ‘कॉन्ट्रक किलर’
भारतीय रेल्वेत दर वर्षी उंदरांच्या नायनाटासाठी लाखों रुपये खर्च केला जातो. या रेल्वे स्टेशनवरील उंदरांवर उपाययोजना नाही केली तर रेल्वे रूळावरून घसरण्याची भीती असते.अनेक रेल्वे प्लॅटफॉर्मवर उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रवासी आणि स्टेशन कर्मचारी हैराण झाले आहेत. उंदरांवर नियंत्रणासाटी लाखो रूपये खर्च करून कंत्राटदारांची नियुक्ती केली जात आहे.औषदांच्या माध्यमातून हे उंदाराना मारण्याचा सपाटा सुरु आहे. मात्र या कंत्राटदारांवर लाखा रूपये खर्च करुन उंदरांवर रेल्वेला नियंत्रण मिळवता येत नाही आहे.

या औषधांचा होतो वापर?
पश्चिम रेल्वे उंदराच्या नियंत्रणासाठी रेल्वे कारशेड, रेल्वे कोचेस मध्ये ग्लू बोर्ड, जीनीक फोसफाईल आणि ब्रोमोडीलोन या सारख्या उंदीर मारण्यासाठी औषधेचा वापर करण्यात येते. तर रेल्वेच्या कॉलनीत उंदरांच्या नियंत्रणासाठी रेल्वेकडून ‘रेटॉल रेट केक’ चा वापर करण्यात येते. त्यामुळे हे औषधे टाकत असताना मोठया सावद गीर बाळगावी लागते.