घरमुंबईरुग्णांचे हाल थांबणार, अखेर डॉक्टरांचा संप मागे

रुग्णांचे हाल थांबणार, अखेर डॉक्टरांचा संप मागे

Subscribe

जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांनी अखेर ४ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना शनिवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. या संपावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज बैठक घेतली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांना सुरक्षा देण्याचा निर्णय मान्य करण्यात आला.

रुग्णालयात सुरक्षारक्षक नेमणार –
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, रुग्णालयात नव्याने २८ तात्काळ सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने प्रत्येक वॉर्डनुसार २८२ सुरक्षारक्षकांची मागणी केली होती. शिवाय जे.जे दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे मिळून एका वर्षापूर्वी १७२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. येत्या दीड महिन्यात अलार्म सिस्टिम बसवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

२ वर्षानंतर डॉक्टरांच्या मागण्या मान्य –
रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावे या मागणीसाठी जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. या मागणीसाठी गेल्या २ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पण, काहीच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता आश्र्वासन नको, अंमलबजावणी पाहिजे या निर्णयावर डॉक्टर ठाम होते. त्यानुसार, आज डॉक्टरांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -