घरमुंबईजे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल; तीन तासांनंतर बेस्टने केली वीज पूर्ववत 

जे. जे. हॉस्पिटलची बत्तीगुल; तीन तासांनंतर बेस्टने केली वीज पूर्ववत 

Subscribe

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. या सरकारी हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि डॉक्टरांची तारांबळ उडाली. सकाळी ओपीडीच्या वेळेस अचानक वीज गायब झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा गोंधळ झाला.

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. या सरकारी हॉस्पिटलच्या कर्मचारी आणि डॉक्टरांची तारांबळ उडाली. सकाळी ओपीडीच्या वेळेस अचानक वीज गायब झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा गोंधळ झाला. पण, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हजेरी लावत दोन तासांत वीज पुरवठा पूर्ववत केला. तसेच, वीज पुरवठा बंद होण्याचा आजचा दुसरा दिवस असल्याचे समजत आहे. सकाळीच विजेचा पुरवठा बंद झाल्याने काही शस्त्रक्रियाही रद्द केल्या गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळी ७.४५ ते १०.४५ या वेळात वीज पुरवठा खंडित झाला. नवीन इमारत, ओपीडी आणि ऑपरेशन थिएटर या विभागातील वीज गेल्याचे सांगण्यात आलं. यामुळे ओपीडी भागात जमलेल्या बाह्य रुग्णांमध्ये काही काळासाठी गोंधळ उडाला. यापूर्वी वीज गेल्याच्या कारणांमध्ये सबस्टेशनमध्ये बिघाड आणि पाऊस हे कारण सांगण्यात आलं होतं. तर, या तीन तासांमध्ये अंधार पसरून रुग्णांचे प्रचंड हाल होत झाल्याची तक्रारही रुग्णांनी केली आहे. तर, वीजपुरवठा खंडित होण्याचं नेमकं कारण समजण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला संपर्क केला असता होऊ शकला नाही. पण, वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन सुविधा सुरू केल्याच्या वीज उपकरणांचा दाब वीज पुरवठ्यावर येत आहे.

- Advertisement -

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. तीन तासानंतर पावणे अकरा वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला.

हेही वाचा –

विधानसभेच्या उमेदवारीविषयी अखेर बोलले पार्थ पवार…!

- Advertisement -

आणि भुजबळ भाजपला म्हणाले, ‘ती’ एक जागा तरी आम्हाला सोडणार का?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -