घरमुंबईऑनलाईन परीक्षेमुळे विधीच्या विद्यार्थ्यांना जॅकपॉट

ऑनलाईन परीक्षेमुळे विधीच्या विद्यार्थ्यांना जॅकपॉट

Subscribe

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. परंतु या ऑनलाईन परीक्षेमुळे तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुणांचा चक्क जॅकपॉट लागला आहे.

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. परंतु या ऑनलाईन परीक्षेमुळे तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुणांचा चक्क जॅकपॉट लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बहुपर्यायी प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र भरमसाट मिळालेल्या गुणामुळे प्रक्टिस करताना वरिष्ठाकडून हिणवले जाण्याची भिती विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामध्ये घेतलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणापत्रावर ‘कोरोना’चा कोणताही उल्लेख नसेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत विधीचा निकाला हा ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत लागत होता. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ७५ टक्क्यांपर्यंत गुण मिळत होते. मात्र यावेळी ऑनलाईन घेतलेल्या बहुपर्यायी परीक्षेत विद्यार्थ्यांनी चक्क पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. अनेक कॉलेजांमधील बहुतांश विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. गर्व्हमेंट लॉ कॉलेजमध्ये २९७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ ६२, श्री जयंतीलाल एच. पटेल लॉ कॉलेज ४९, डॉ. डी.वाय.पाटील लॉ कॉलेज ४८, अस्मिता लॉ कॉलेज ४३, कीर लॉ कॉलेज ३१, अ‍ॅड. बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ २४, हरिया लॉ कॉलेज २३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. यंदा बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आमच्यासाठी हा निर्णय हास्यास्पद ठरू शकतो अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कारण विधी अभ्यासक्रमात एवढा मोठ्या प्रमाणात निर्णय कधीच लागला नसताना अशाप्रकारे निकाल आल्याने वरिष्ठांकडून आम्हाला हिणवले जाण्याची भिती विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

एटीकेटी विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण

विद्यार्थ्यांना गुणांची खैरात झाली असताना नवव्या सेमिस्टरला एटीकेटी लागलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधी अभ्यासक्रमाचा निकाल यापूर्वी कधीही ४० टक्क्यांपेक्षा जास्त लागलेला नाही. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे. यावर्षी लागलेला निकालामुळे विद्यार्थ्यांकडे वरिष्ठांनी हास्यास्पद भावनेने पाहू नये. त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनंगड निर्माण होण्याची शक्यता आहे.
– अ‍ॅड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -