उद्धव ठाकरेंना मुंबईकरांच्या जीवापेक्षा निवडणुकीचा प्रचार महत्त्वाचा – जयंत पाटील

सीएसएमटी पूल दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र शिवसेना आणि भाजप प्रचारात गुंतले आहेत. यांना राजकारण आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Mumbai
NCP State President Jayant Patil
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचसोबत जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट न देता निवडणुकीच्या प्रचाराला प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उध्दव ठाकरे यांनी टीका केली आहे. ‘मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र शिवसेना आणि भाजप प्रचारात गुंतले आहेत. यांना राजकारण आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहे, असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

भाजप-सेनेला प्राचारसभा महत्वाच्या वाटतात

सीएसएमटी पूल दुर्घटनेच्या ठिकाणी भेट द्यायला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना वेळ नाही. उध्दव ठाकरे अमरावतीला प्रचारसभा घेत आहेत. राज्यकर्ते किती संवेदनाहीन झाले आहे, याचेच हे उदाहरण असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केला त्या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी आम्ही करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांनी अमरावती येथे युतीच्या ४८ पैकी ४८ जागा निवडून आणू असे वक्तव्य केले. त्यांनी ४८ पैकी ५० जागा निवडून आणू असे नाही म्हटले. महाराष्ट्र शिवसेना भाजप विरोधात मतदान करेल. युतीच्या १५ जागा तरी निवडून येईल का त्याबाबत शंका आहे.

भाजपला सत्तेची मग्रुरी

गुरुवारी संध्याकाळी सीएसएमटीजवळ पूल पडल्यानंतर सहा जण मृत्युमुखी पडले तर ३६ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर भाजपच्या संजीव वर्मा नावाच्या पदाधिकाऱ्याने अकलेचे तारे तोडले. मुंबईकरांनीच या धोकादायक पुलावरून कशाला चालायचे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मला वाटतं ही भाजपची सत्तेची मग्रुरी आहे. मुंबईकर भाजपच्या मग्रुरीला जोरदार उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here