घरगणपती उत्सव बातम्यालालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव

लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव

Subscribe

लालबागच्या राजाला दानाचा स्वरुपात प्राप्त होणाऱ्या दागिन्यांचा दरवर्षी लिलाव केला जातो. त्याप्रमाणे तो आज केला जाणार आहे.

गणेशभक्तांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी गणेशभक्त भरभरूण दान देतात. दागिन्याच्या स्वरुपात मिळालेल्या दानाचे आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लिलाव केला जाणार आहे. आज सायंकाळी परळ येथे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या स्टेजवर या विविध सोने चांदीच्या वस्तूंच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भरभरून दानही देत असतात. यावर्षी एका भक्ताने चक्क राजाचीच प्रतिकृतीची एक किलो २७१ ग्रॅमची हिरेजडीत सोन्याची मूर्ती अर्पण केली आहे. या मूर्तीच्या मुकुटात हिरा बसवलेला आहे, त्यामुळे ही मूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरली आहे. आज होणाऱ्या लिलावात या मूर्तीसहीत सोन्याची वीट, चांदीच्या वस्तू, चमचा, महागडी घड्याळे, मोदक, त्रिशूल अशा सर्व वस्तू राजाच्या दागिन्यांच्या लिलावादरम्यान मांडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हे पहा – लालबागचा राजा दानपेटीचे मोजमाप सुरु

लालबागच्या राजाला प्राप्त होणाऱ्या दानाचा दरवर्षी लिलाव केला जातो. भाविक राजाच्या चरणी सोने, चांदीच्या किमती वस्तू अर्पण करतात. या वस्तू राजाच्या चरणी अर्पण केल्यामुळे आपण त्या घेतल्या तर लालबागच्या राजाची कृपादृष्टी आपल्यावर राहिल, या आशेने अनेक गणेशभक्त या लिलावात सहभागी होत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लिलावाला गर्दी होणार अशी शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -