घरमुंबईख्रिसमसच्या निमित्ताने पुष्करचे नवे सेलिब्रेशन सॉंग

ख्रिसमसच्या निमित्ताने पुष्करचे नवे सेलिब्रेशन सॉंग

Subscribe

ख्रिसमसचे सेलिब्रेशन हटके आणि डान्सिंग स्टाईलने करण्यासाठी व्हिडीओ पॅलेसचे डान्सिंग नंबर ‘झिल मिल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने अनेकांना प्रेमात पाडल्यानंतर व्हिडीओ पॅलेस सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ या गाण्यावर प्रत्येकाला थिरकायला भाग पाडणार आहे.

ख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनच्या तयारीला आता सगळीकडे सुरुवात झाली आहे. सेलिब्रेशन तितक्याच हटके आणि डान्सिंग स्टाईलने करण्यासाठी व्हिडीओ पॅलेसचे डान्सिंग नंबर ‘झिल मिल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने अनेकांना प्रेमात पाडल्यानंतर व्हिडीयो पॅलेस सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ या गाण्यावर प्रत्येकाला थिरकायला भाग पाडणार आहे. गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत ‘झिल मिल’ या डान्सिंग नंबरवर पुष्कर जोगचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. अभिनयासोबत पुष्कर हा त्याच्या डान्ससाठी देखील तितकाच प्रसिध्द आहे. पुष्करला डान्सची किती क्रेझ आहे आणि मनापासून आवड आहे हे आपण अनेकदा शो, चित्रपटांतून पाहिले आहे. त्यामुळे पुष्करची ‘झिल मिल’ ही त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल ट्रिट असणार आहे.

गाण्यामध्ये ‘हे’ कलाकार दिसणार

या गाण्यातील अभिनेता, गायक, संगीतकार आणि लोकेशन्स हे ‘झिल मिल’चे वैशिष्ट्ये आहेत. गायक सलिम मर्चंट यांनी त्यांच्या रॉकिंग आवाजाने या गाण्यात जाण आणली असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये सलिम मर्चंट यांनी प्रेक्षकांना सुपरहिट गाणी दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या आवाजातील ‘झिल मिल’ हे गाणं मराठी प्रेक्षकांसाठी एक खास न्यू इयर भेट आहे. यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री-गीतकार अदिती द्रविड हिने या गाण्याचे बोल लिहिले असून साई-पियुष या जोडीने या गाण्याला म्युझिक दिले आहे.

- Advertisement -

गाण्याचे शूटिंग ऑस्ट्रेलिया आणि सिडनीमध्ये 

आता मराठी सिंगल गाण्यांचे शूटिंग देखील परदेशात व्हायला लागली आहेत. ही आपल्या प्रत्येकासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ‘झिल मिल’ या गाण्याचे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी शूट झाले आहे. त्यामुळे या व्हिडीओ गाण्यामधून प्रेक्षकांची मेलबर्न आणि सिडनीस सफारी होणार हे नक्की!


हेही वाचा – प्रेक्षकांना माझं वेगळं रूप पाहायला मिळालं – पुष्कर जोग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -