घरमुंबईराजधानीत मिळणार झुणका भाकर आणि वांग्याचे भरीत

राजधानीत मिळणार झुणका भाकर आणि वांग्याचे भरीत

Subscribe

देशाची राजधानी दिल्लीसाठी मध्य रेल्वेने पहिली राजधानी एक्स्प्रेस सुरु करून मध्य रेल्वेच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांना मोठा दिलासा आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीला चालना देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) राजधानी एक्स्प्रेसमध्ये झुणका-भाकर आणि वांग्याचे भरीत देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आयआरसीटीसीकडून चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. लवकर राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना झुणका-भाकर सोबतच वांग्याच्या भरीताचा आस्वाद घेता येणार आहे.

मध्य रेल्वेने १९ जानेवारीपासून दिल्लीसाठी नव्या राजधानी एक्स्प्रेसची सुरुवात केली आहे. याला प्रवाशांच्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही नवी राजधानी एक्सप्रेस मुंबई, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ मार्गाने दिल्लीला जाते. त्यामुळे राजधानीच्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसी महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ देण्याचा विचार सुरू आहे. ज्यात झुणका भाकर आणि खानदेशातील वांग्याचे भरीत यांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला चालना मिळेल असा मानस आयआरसीटीसीच्या आहेत. त्यासाठी राजधानीमध्ये झुणका भाकर आणि वांग्याच्या भरत्यावर आयआरसीटीकडून चाचण्या घेणे सुरुवात केली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या नव्या राजधानी एक्सप्रेसमध्ये झुणका भाकर आणि वांग्याचे भरती प्रवाशांना मिळणार आहे. आज महाराष्ट्रात झुणका भाकरीला वेगळे स्थान आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने सुद्धा या झुणका भाकर केंद्र सुरू करून याला चालना दिली आहे. त्याचप्रमाणे आता आयआरसीटीसी आपल्या प्रवाशांना यांची चव चाखवणार आहे. नवी राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग महाराष्ट्रातून जात असल्याने प्रवाशांना याच्या आस्वाद घेता येणार आहे. अशी सुरू आहे चाचणी आयआरसीटीसी प्रशासनाकडून महाराष्ट्रातून जाणार्‍या आलिशान राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांची आवड निवडीसाठी वेगवेगळ्या चाचण्या घेत आहे. महाराष्ट्रातील कोणते खाद्यपदार्थ ट्रेनच्या नियामात बसतो यांच्याही चाचण्या सध्या सुरु आहेत. सोबतच या नियमात झुणका भाकर आणि वांग्याचे भरीत बसत आहे. त्यामुळे आयआरसीटीसी काही राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बेसनपासून तयार होणारा झुणका आणि ज्वारीच्या भाकरीच्या चवीसाठी देण्यात येत आहे. त्यांची चव कसा लागतो. यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. त्या प्रतिक्रियांच्या सखोल अभ्यास आयआरसीटीसीकडून करणार येणार आहे. सोबतच या चाचण्यांमध्ये प्रवाशांच्या सूचनांचा समावेश करण्यात आले आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहेत.

झुणका भाकर सुरू करण्यासाठी आम्ही नव्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून फीडबॅक घेत आहोत. सोबतच प्रवाशांच्या आवडी-निवडीचा अभ्यास सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच सुविधा सुरू करण्यात येतील.
-पिनाकीन मोरावाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -