घरमुंबईअबब! महिलेच्या पोटातून काढला ३० किलोचा ट्यूमर

अबब! महिलेच्या पोटातून काढला ३० किलोचा ट्यूमर

Subscribe

जे.जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेच्या पोटातील ३० किलोंचा ट्यूमर काढला.

उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथून आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून ३० किलोचा ट्यूमर काढण्यात जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या यूनिटला यश आलं आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तसनीम (बदललेले नाव) यांना त्रास होत होता. पण, मुरादाबाद इथल्या स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यानंतर त्या मुंबईतील सरकारी रुग्णालयांपैकी जे.जे. या प्रमुख रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयाच्या झडपा, यकृत, पित्ताशय आणि गर्भाशय या शरीरातील सर्व अवयवांमध्ये हा ट्यूमर पसरला होता.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे. तसनीम यांचं पोट एखादा मोठा फुगा फुगवावा, एवढं फुगलं होतं. २४ जानेवारीला तसनीम जे.जे मध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर, काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी या महिलेवर ४ फेब्रुवारी या दिवशी शस्त्रक्रिया केली गेली. आता या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना जे.जे. हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी सांगितलं की, “ही महिला उत्तर प्रदेशातून आली आहे. ही अविवाहित महिला असून एवढा मोठा ट्यूमर पोटात असणं अशा घटना खूप दूर्मिळ असतात. ३ किलोचं १ बाळ अशी १० बाळ होतील एवढं या ट्यूमरचं वजन होतं. हृदयाच्या झडपा, यकृत, पित्ताशय आणि गर्भाशय या अवयवांमध्ये हा ट्यूमर पसरला होता. शिवाय, त्या ट्यूमरमध्येही रक्त जमा झालं होतं. अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया होती. सिटीस्कॅनच्या रिपोर्टमध्ये १ सेंटिमीटर एवढी सुद्धा जागा नव्हती. गेल्या दोन दिवसांपूर्वीच तिला सीसीयूमधून वॉर्डमध्ये शिफ्टमध्ये करण्यात आलं आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे.”

जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची यशस्वी कामगिरी

- Advertisement -
JJ-hospital-doctors-remove-a-giant-tumour-of-30-kg-from-womans-body-696x928
जेजे रुग्णालय

पाच तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ही महिला आता नॉर्मल आयुष्य जगू शकते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनीही जे.जे. रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. तर, याविषयी तसनीम यांनी सांगितलं की, “गेल्या सहा महिन्यांपासून मला त्रास होत होता. अचानक वाढत चाललेला पोटाचा घेराने श्वास घेणेही मुश्किल केले होते. हृदयाला भिडणारा हा घेर नेमका कसला याचे निदान होत नव्हते. पण, आता मी मोकळा श्वास घेऊ शकते. आता बरं वाटतंय. ”

या आधीही कामा रुग्णालयात २० किलोचा ट्यूमर काढण्यात यश आलं होतं. त्यामुळे, सरकारी रुग्णालयात कितीही वजनाचे आणि गुंतागुंतील ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत असल्याचे समोर आले आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -