घरमुंबईभिवंडीत दोघा वीज चोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

भिवंडीत दोघा वीज चोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

शहरातील नागांव येथील समर्थ बिल्डिंगमध्ये राहणार्‍या भाडेकरूने तसेच अशोक नगर येथील व्यापार्‍याने राहत्या घरात चोरून वीज घेतल्याचे निदर्शनास आल्याने या दोघा वीज चोरांविरोधात टोरेंट पॉवर प्रशासन विद्युत कंपनीने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागांव येथे घर मालक अंकुश महादू पाटील यांच्या नावे असलेल्या विद्युत मीटरवरून भाडेकरू संतोष कलूराम जैसवाल याने भाड्याच्या घरात राहत असताना चोरून वीज जोडणी घेऊन टोरेंट पॉवर कपंनीचे 1 लाख 46 हजार रुपयांचे वीज बिल थकवले आहे.

थकीत वीज बिल भरण्यासाठी टोरेंट पॉवर प्रशासनाने वारंवार नोटीस बजावूनही त्याकडे डोळेझाक केल्याने अखेर वीज कंपनीने विद्युत साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात विद्युत कायदा कलम 135 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला होता. मात्र, तरीही संतोष याने वारंवार चोरून वीज घेऊन वापर सुरू केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी वीज चोर संतोष यास अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर अशोक नगर येथील व्यापारी शेखर केशरवाणी यानेदेखील राहत्या घरात चोरून वीज घेऊन 2 लाख 33 हजार 112 रुपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही न्यायालयात हजर केले असता त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -