Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई राज्यात ६ जून हा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून होणार साजरा

राज्यात ६ जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून होणार साजरा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Related Story

- Advertisement -

देशासह महाराष्ट्र राज्याचे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून हा दिवस राज्याभिषेक दिन म्हणून साजरा होतो. परंतु यापुढे हा दिवस “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली. राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्येही हा दिवस साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन . या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करून स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृध्दीने भरली होती. त्यामुळे हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने वरील निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या स्थानिक स्वराज्य संस्थांत सकाळी अकरा वाजता सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुढी उभारून त्यास अभिवादन करतील. महाराष्ट्रगीत, राष्ट्रगीताचे गायन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर केला जाईल यासंदर्भात माहिती देणारे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.

- Advertisement -