घरमुंबईअग्निशमन दल प्रमुखपदी हिवराळे यांची नियुक्ती

अग्निशमन दल प्रमुखपदी हिवराळे यांची नियुक्ती

Subscribe

शशिकांत काळे यांची गच्छंती

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत सिटी सेंटर मॉलचे प्रकरण गाजत असतानाच मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. आता या महत्त्वाच्या पदावर कैलास हिवराळे (उप प्रमुख) यांना बढती देण्यात येऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार आजच स्वीकारला आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांची ऑगस्ट महिन्यात अचानक बदली करण्यात आली. त्यांना उपायुक्त पदी (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) बढती देण्यात आली. त्यामुळे शशिकांत काळे यांना अग्निशमन दलाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या तीन महिन्यातच त्यांची गच्छंती करण्यात आली आहे. काळे यांनी राष्ट्रपती पुरस्कारासाठी राज्य व केंद्र सरकारकडे दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते. प्रसंगी त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची सह-आयुक्त सामान्य (प्रशासन) मिलीन सावंत यांच्या मार्फत खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याने शशिकांत काळे त्यांना अग्निशमन दल प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे.

- Advertisement -

आता अग्निशमन दलाच्या प्रमुख पदावर कैलास हिवराळे यांना बढती देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कैलाश हिवराळे हे १६ फेब्रुवारी १९८९ रोजी मुंबई अग्निशमन दलात दाखल झाले. त्यांनी मुंबईत झालेल्या २६/११ च्या आतंकी हल्ल्याच्या प्रसंगी बचावकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तसेच, कमला मिल भीषण आग प्रकरण, घाटकोपर श्रेयस गार्डन येथील इमारत दुर्घटना, हॉटेल किनारा दुर्घटना आदी प्रकरणात स्वतः सहभाग घेतला होता. त्यांचे मूळ गाव औरंगाबाद आहे. त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल २०१९ ला राष्ट्रपती पदक मिळाले आहे. ते सायन्स पदवीधर आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आग, इमारत दुर्घटना आदी घटनाप्रसंगी मोलाची कामगिरी बजावली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -