घरमुंबई२ कोटींची फसवणूक करणाऱ्या कालेल बंधूंना अटक करा

२ कोटींची फसवणूक करणाऱ्या कालेल बंधूंना अटक करा

Subscribe

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आदेश

गुंतवलेल्या पैशांची रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या कालेल बंधू आणि संबंधित कंपनीच्या सर्व संचालकांनाही अटक करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले आहेत. आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या स्थापन करून कालेल बंधू आणि या कंपन्यांच्या संचालकांनी १८ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून फसवणुकीतील गुंतवणुकीचा आकडा हा दोन कोटी रुपयांपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भिशी चालवणाऱ्या महिला, पुरुषांना हेरून त्यांना रक्कम दुप्पट करण्याचे, मोठे कमिशन देण्याचे आमिष दाखवून कालेल बंधुनी अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण २०११ मध्ये पहिल्यांदा उघड झाले होते. मात्र, त्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही. दुसऱ्यांदा याबाबत २०१५ साली गुंतवणूकदारांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळेसही तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. हे प्रकरण दिवाणी प्रकारात येत असल्याचे सांगून न्यायालयात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. त्यांनतर फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे १९ मे रोजी लेखी तक्रार केली. त्यानंतर पाटील यांनी २३ मे रोजी कापूरबावडी पोलिसांना या प्रकरणी तक्रार दाखल करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिल्याची माहिती तक्रारदारांनी दिली.

- Advertisement -

तक्रारदारातील सुमारे १८ जणांसह इतर गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धनवर्षा इन्फ्रा अँड प्रॉपर्टीजच्या कंपनीचे संचालक आणि कंपनी लिडरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तक्रारदारांनी दिली. तर यासंदर्भात लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण ?

कालेलबंधूंनी २०११ मध्ये इंपेंडिंग बिजनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी सुरू केली. दोन वर्षांनंतर ही कंपनी बंद करून २० नोव्हेंबर २०१३ मध्ये आयबीएस कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू करण्यात आली. अशाच प्रकारे सचिन कालेलने १८ ऑगस्ट २०१५ रोजी धनवर्षा इन्फ्रा अँन्ड प्रॉपर्टीज नावाची कंपनी सुरू केली. यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतून १ हजार २०० एजंट्च्या माध्यमातून आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांकडून पैसा जमा करण्यात आला. ठाण्यातील कापूरबावडी या ठिकाणी असलेल्या कालेल बंधूंच्या या कंपनीने एक वर्षाच्या आरडी, एफडी व पेंशन योजनेत एजंट म्हणून गुंतवणूक केल्यास आकर्षक मोबादला देण्याचे आमिष कंपनीतील लिडर मानले जाणारे टेकलाल पंडित, विराज भालेकर, उमेश महाडिक, प्रसाद जवरत, रामचंद्र पार्टे व अरुण सोनावणे यांनी गुंतवणूकदारांना दिले होते. या आमिषाला बळी पडत अनेकांनी आपले पैसे या कंपनीत गुंतवले. मात्र, कालांतराने मोबदला मिळत नसल्याने तसेच कंपनी संचालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -