घरमुंबईपूर्वाश्रमीचे 'राणे समर्थक' कालिदास कोळंबकरांना सेना-भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

पूर्वाश्रमीचे ‘राणे समर्थक’ कालिदास कोळंबकरांना सेना-भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून ठेवले दूर

वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आपल्या कार्यालयावर लावून भाजप प्रवेशाचे संकेत दिले असले तरी कोळंबकर यांना ना भाजपचे कार्यकर्ते स्वीकारायला तयार आहेत, ना शिवसेनेचे कार्यकर्ते. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारापासून कोळंबकर यांना सध्या दूरच ठेवले जात आहे.

शेवाळेंच्या प्रचारात सहभागी होण्याची कोळंबकर यांची इच्छा आहे. परंतु त्यांच्या या प्रस्तावाबाबत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील कार्यकत्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोळंबकर त्यांची इच्छा असूनही प्रचारात सहभागी होऊ शकत नाही.

- Advertisement -

काँग्रेसचे आमदार असलेले कालिदास कोळंबकर हे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या जवळ आहेत. परंतु दुसरीकडे शिवसेना प्रवेशाची शक्यताही ते पडताळून पाहत आहेत. आपल्या कार्यालयावरील काँग्रेसचा फलक काढून मुख्यमंंत्र्यांचा फोटो असलेला फलक लावल्यामुळे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा ते प्रचार करतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, कोळंबकर यांची शेवाळेंचा प्रचार करण्याची इच्छा असली तरी प्रत्यक्षात त्यांना शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असल्याची माहिती मिळत आहे. शेवाळेंचा प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु कोळंबकर प्रचारात आल्यास आम्ही कुणीही प्रचार करणार नाही,अशी भूमिका प्रथम वडाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतली. त्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही तीच भूमिका घेतली. त्यामुळे शेवटी राहुल शेवाळे यांनी कोळंबकर यांना प्रचारापासून दूर ठेवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

कोळंबरकरांना यापूर्वीचे ‘राणे समर्थन’ बनले डोकेदुखी
वडाळा विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसचे कोळंबकर विजयी झाले. तर भाजपचे मिहिर कोटेचा दुसर्‍या क्रमांकावर होते. अवघ्या ७०० मतांनी कोटेचा पराभूत झाले तर शिवसेनेचे डोके हे तिसर्‍या क्रमांकावर होते. त्यामुळे कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आपला पत्ता कापला जाईल, याची भीती मिहिर कोटेचा यांना आहे. शिवाय या मतदारसंघावर माजी महापौर श्रध्दा जाधव यांचाही दावा आहे. त्यामुळे ७०० मतांनी हरणार्‍यांची मदत महायुतीला नको. त्यांची मदत न घेताही वडाळा विधानसभेत मोठे मताधिक्य मिळवून दिले जाईल,असे शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेली अनेक वर्षे ज्यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जीव लावून काम केले, त्यांची मदत घेतली जावू नये ही शिवसैनिकांची भावना असल्याने शिवसैनिकांचा याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सध्या तरी कोळंबकर हे प्रचार करताना दिसत नसले तरी भविष्यातही त्यांची मदत न घेण्याची महायुतीच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -