घरताज्या घडामोडीकल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आता घरपोच सामान

कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आता घरपोच सामान

Subscribe

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिका प्रशासन जीवनावश्‍यक सेवा, सुरळीत ठेवण्‍यासाठी अथक प्रयत्‍न करीत असून आता कल्याण डोंबिवलीकरांना घरपोच सामान मिळणार आहे.

राज्‍यात सर्वत्र पसरत चाललेल्‍या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिका प्रशासन जीवनावश्‍यक सेवा, सुरळीत ठेवण्‍यासाठी अथक प्रयत्‍न करीत आहे. भाजी मंडईमध्‍ये आणि किराणा दुकानात नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. मात्र, तरीसुद्धा नागरिकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्‍यासाठी आणि महापालिकेतील नागरिकांना घरपोच किराणा सामान आणि भाजीपाला पुरविण्‍यासाठी महापालिकेने ‘Aaple Mandi’ या सरकारी संस्‍थेच्‍या Appची मदत घेतली असून त्‍यांचे समवेत कल्‍याण डोंबिवलीच्‍या सर्व प्रभागामध्‍ये ११५ किराणा दुकानांशी टायअप केले आहे. सदर App डाउनलोड केले असता, जीवनावश्‍यक वस्‍तुंची साधन सामुग्री नागरिकांना या Appद्वारे सदर दुकानातून ऑनलाईन पद्धतीने मागविता येईल. ही सुविधा रविवारपासून सुरू होणार आहे.

‘आपले मंडी’Appची केडीएमसीने घेतली मदत

सदर Appची सुविधा निःशुल्‍क असून, कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वास्‍तव्‍य करणा-या नागरिकांस जीवनाश्‍यक वस्‍तूंची सेवा, सुविधा पुरविण्‍याकरीता Appचा आवश्‍यकतेनुसार वापर करण्‍याचे आवाहनही केले आहे. तसेच Appद्वारे ऑनलाईन ट्रान्झेक्शन आणि कॅश ऑन डिलेव्हरी ही सुविधा उपलब्‍ध असून ती पुरविण्याबाबत महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला आहे. त्‍याचप्रमाणे महापालिकेचे दिव्‍यांग आणि वृद्ध नागरिकांसाठी महापालिकेने प्रत्‍येक प्रभागात मदत करणेसाठी मदतनिसाची नियुक्‍ती केली असून अशा वृद्ध आणि दिव्‍यांग व्‍यक्तिंनी संबंधित मदतीस यांच्याशी संपर्क साधल्‍यावर त्‍यांच्यामार्फत सदर परिसरातील दुकाने, मेडिकल स्‍टोअर्स यांच्याशी संपर्क साधून अशा व्‍यक्तिंना घरपोच किराणा माल आणि औषध पुरविण्‍याची सेवा उपलब्‍ध करुन दिली जाणार आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील एकूण ४२४ नागरिकांनी फोनद्वारे (दिव्‍यांग, वयोवृद्ध आणि इतर नागरिकांनी) माहितीसाठी अथवा घरपोच सेवा मिळण्‍यासाठी संपर्क साधला असून २०४ नागरिकांना घरपोच सेवा देण्‍यात आलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘करोना’ विरोधात सार्वजनिक मंडळे एकवटली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -