घरमुंबईकल्याण - कसारा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

कल्याण – कसारा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

Subscribe

कल्याण - कसारा स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी देखील मध्य रेल्वेवरील वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिराने सुरू आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण – कसारा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली सकाळी ठप्प झाली होती. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिराने सुरू होती. त्यामुळे मध्य रेल्वेवर त्याचा आता परिणाम झाला आहे. शिवाय, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मध्य स्थानका दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी देखील मात्र मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून येत आहे. तसेच बऱ्याच प्रवाशांना शनिवारी सुट्टी असल्याकारणाने ते विकेंडचा दिवस असल्याने या दिवशी अनेक प्रवासी फिरण्यासाठी बाहेर जातात. मात्र या तांत्रिक बिघामुळे त्यांचा देखील खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -