कल्याण पोलिसांनी आवळल्या टकटक गँगच्या मुसक्या

कल्याण पोलिसांच्या अँन्टी रॉबरी स्कॉडने या आंतरराज्यीय टकटक टोळीतील ९ जणांना रंगेहात अटक करून बेडया ठेाकल्या आहेत.

Kalyan
kalyan police arrested nine people of taktak gang
कल्याण पोलिसांनी आवळल्या टकटक गँगच्या मुस्क्या

चड्डी गँग, बनियन गँग, टोपी गँग आणि चादर गँग अशा अनेक गँगची नावे तुम्ही ऐकली असतीलच. पण आता “टकटक ” नावाची नवीन गँग उजेडात आलीय. सामान्य माणसाच्या अंगावर खुजली टाकून तसेच गाडीवर टकटक करून वाहन चालकांना ही गँग लुटत असल्याचे समोर आले आहे. पण कल्याण पोलिसांच्या अँन्टी रॉबरी स्कॉडने या आंतरराज्यीय टकटक टोळीतील ९ जणांना रंगेहात अटक करून बेडया ठेाकल्या आहेत.

आरोपींविरोधात ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल

संजय नायडू, बेन्जीयम व्यंकटेशलू इरगदीनल्ला, दासू बाबू येड्डा, सालोमन लाजर गोगुला, अरूणकुमार अब्रहम पेटला, राजन लाजर गोगूल, मोशा याकूब मोशा, डॅनियल प्रसंगी अकुला आणि इलीयाराज केशवराज अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. हे चेन्नई आणि आंध्रप्रदेश येथील रहिवाशी आहेत. या आरोपींवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात तब्बल ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

ठाणे पोलीस आयुक्तालयातील चोरी घरफोडी आणि चैन स्नॅचिंग सारखे गुन्हयांवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रत्येक पोलीस परिमंडळाच्या हद्दीत अॅन्टी रॉबरी पथक तयार केले आहे. सोमवारी कल्याणचे अॅन्टी रॉबरी पथकाचे पोलीस गस्त घालीत असतानाच एक मोटारसायकल चालक संशयितरित्या फिरताना त्यांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता इलीयाराज केशवराज असे नाव त्याने सांगितले. त्याच्याकडील मोटारसायकल ही नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्हयात वापरली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसी हिस्का दाखविताच तो तामीळ भाषेत बोलू लागला. त्याला हिंदी बोलता येत नसल्याने पेालिसांनी दुभाषिकाद्वारे त्याची चौकशी केली त्यानंतर धक्कादायक महिती उजेडात आली.

आरोपींकडून मोठ्याप्रमाणात साहित्य जप्त

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील एक बँक लुटण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती त्याने दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी साध्या वेषात सापळा रचला. त्याचवेळी बँक लुटण्यासाठी ९ दरोडेखोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून अटक केली. पोलीस आणि चोरटयांमध्ये झटापट झाली यावेळी एकाने पोलीसाला चावा घेतल्याचाही प्रकार घडला. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ मोटारसायकल, मिरची पावडर, ३ कोयते, २ चाकू, ३ नायलॉन दोरी, खुजली पावडर, एक कटावणी तसेच २ हेल्मेट, २ रिफलेक्टर जॅकेट, २ बेचक्या, लोखंडी गोळया, काचकटर, स्कू ड्रायव्हर, २५ मोबाईल आणि २५ वेगवेगळया प्रकारचे सीमकार्ड हा माल पोलिसांनी हस्तगत केला. यांच्यावर औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नागपूर, गोंदिया तसेच कर्नाटक राज्यात विविध पोलीस ठाण्यात एकूण २३ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली असून इतर राज्यातीलही गुन्हे दाखल असण्याची शक्यता पानसरे यांनी व्यक्त केली.

चाळीत भाडयाने घर घेऊन बिगारी काम करायचे

दक्षिण भारतातील असणारी ही टोळी वेगवेगळया राज्यात चाळीत भाडयाने घर घऊन राहत असे. तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवर बिगारी काम करीत असे. बँकेच्या बाहेरच ही टोळी दबा धरून बसत असे, ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना हेरून त्यांच्या अंगावर खुजली टाकून त्यांच्या हाताील बॅग हिस्कावत. तसेच छोटया बेचकीच्या सहाय्याने गाडीची काच फोडून गाडीतील तसेच डिकी तोडून त्यातील बँग पळवून नेत. सामान्य माणसाच्या मानेवर आणि मोटारसायकल चालकाच्या हाताला खुजली लावून बँग हिसकावून पळ काढीत असत. माणसाचे लक्ष विचलीत करून त्यांना लुटले जायचे त्यांच्याकडे विविध प्रकारचे सीमकार्ड होते त्यामुळे एकत्रीतपणे बोलण्यासाठी एका सीमकार्डचा वापर करीत. विविध ठिकाणी गेल्यांनतर वेगळे वेगळे सीमकार्ड वापरायचे असे पानसरे यांनी सांगितले.