घरमुंबईसीमकार्डने केला तिच्या हत्येचा उलगडा

सीमकार्डने केला तिच्या हत्येचा उलगडा

Subscribe

भावांनीच केली बहिणीची हत्या

कल्याण : कल्याणमधील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या तरुणीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विवाहित बहिणीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरूनच सख्ख्या भावांनी बहिणीची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भाऊ तीर्थराज यादव याला अटक केली आहे. त्या तरुणीच्या ड्रेसमध्ये असलेल्या मोबाईलच्या सीमकार्डने तिच्या हत्येचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मृत वनिताचा भाऊ तीर्थराज यादवसह, रमाकांत उर्फ पप्पू , आतेभाऊ मनोज यादव आणि वडील मोटू यादव या चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीला कोळसेवाडी परिसरातील रेल्वे यार्डातील निर्जनस्थळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. तिची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र, तिच्याकडे आढळून आलेल्या मोबाईलच्या सीमकार्डवरून तपासाचे चक्र फिरले.

त्यानंतरही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले. त्या महिलेचे नाव वनिता यादव असून ती उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईल नंबरवरून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस वनिताचा भाऊ तीर्थराज यादव यांच्यापर्यंत पोहचले. तो मुंबईतील विक्रोळी भागात राहतो. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.

- Advertisement -

पोलिसांनी तीर्थराजची सखोल चौकशी केली, त्या चौकशीत त्याचे १ जानेवारीचे मोबाईल लोकेशन हे कल्याण असल्याचे समोर आले. त्यामुळे तीर्थराज खोटे बोलत असल्याची पोलिसांन खात्री झाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच त्याने इतर भावांच्या साथीने हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. विवाहानंतर वनिताने परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवले होते. त्यामुळे गावात आणि समाजात बदनामी झाली होती. त्यामुळेच तिची गळा दाबून हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी झाडाला लटकवल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -