घरमुंबईशिवसेनेच्या कल्याण शहर शाखेकडून पूरग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत

शिवसेनेच्या कल्याण शहर शाखेकडून पूरग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत

Subscribe

कोल्हापूर, सांगली आणि कोकणात आलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने दहीहंडी महोत्सव रद्द करुन केवळ साधेपणाने दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडीच्या माध्यमातून पुरात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोल्हापूर, सांगली आणि कोकणात आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने दहीहंडी महोत्सव रद्द करुन केवळ साधेपणाने दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडीच्या माध्यमातून पुरात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहीहंडी उत्सवाची पाच लाखाची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे. यावेळी कल्याण कोळी वाड्यातील गोविंदा पथकाने दहीदंहीला सलामी देत बॅनर झळकवत पुरात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर विनिता राणे, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


हेही वाचा – वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश

- Advertisement -

पूरग्रस्तांसाठी एक लाख ११ हजार मुख्यमंत्री रिलीफ फंडात

राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे डोंबिवलीतील भाजप नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनिषा धात्रक यांच्यावतीने साजरा करण्यात येणारा दही हंडी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. दही हंडीची १ लाख ११ हजार रूपये रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री रिलीफ फंडात दिली जाणार आहे. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त समजताच संध्याकाळची महिलांची दही हंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. यावेळी गोविंदा पथकांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर यावेळी जेटली यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -