घरमुंबईकल्याण-ठाणे जलवाहतूक प्रकल्पाचे लवकरच होणार भूमिपूजन

कल्याण-ठाणे जलवाहतूक प्रकल्पाचे लवकरच होणार भूमिपूजन

Subscribe

कल्याण-ठाणे-वसई या पहिल्या टप्प्यासाठी केंद्राने ६५० कोटी रुपये मंजूर केले असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारी रोजी होत आहे. कल्याण-ठाणे-वसई या पहिल्या टप्प्यासाठी केंद्राने ६५० कोटी रुपये मंजूर केले असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

 वाहतूक होणार सुरळीत

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार जेएनपीटीकडून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. ठाण्यापलिकडील उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली लोकसंख्या वाढ आणि त्याचा रेल्वेसेवेवर आणि रस्ते वाहतुकीवर येणारा ताण यामुळे वाहतुकीसाठी सक्षम पर्याय मिळावा, याहेतूने जलवाहतूक मार्ग विकसित करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी सातत्याने लावून धरली होती. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात कल्याण-ठाणे-मुंबई या जलमार्गाची मागणी केली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट २०१५, २९ जुलै २०१६ आणि ३१ जुलै २०१७ रोजी गडकरी यांच्या दिल्लीतील कार्यालयात या प्रकल्पाबाबत बैठका झाल्या होत्या. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आणि डॉ. शिंदे व राजन विचारे यांच्यासह गडकरी यांच्याकडे सादरीकरण केले होते. शिवसेना खासदारांच्या प्रयत्नांमुळे या जलमार्गाला देशातील १०१ राष्ट्रीय जलमार्गांमध्ये देखील स्थान मिळाले असून जेएनपीटीच्या माध्यमातून आता जलमार्ग विकसित करण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

कामाचा पाठपुरावा केला जाईल

‘ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, नालासोपारा, नवी मुंबई या संपूर्ण परिसराला खाडी किनारा लाभला असून जलवाहतुकीमुळे लाखो नागरिकांना प्रवासाचा सक्षम आणि किफायतशीर पर्याय मिळेल, याचसाठी गेली पाच वर्षे सातत्याने माझा आणि राजन विचारे यांचा पाठपुरावा सुरू होता. श्री. जयस्वाल यांनीही यात सक्रिय पुढाकार घेतला. १९ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन झाल्यानंतर प्रकल्पाचे काम वेगाने आणि वेळेत पूर्ण व्हावे,’ यासाठी देखील पाठपुरावा करत राहू, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -