घरमुंबईसंतापजनक: वायफायचं नाव ठेवलं ‘लष्कर ए तालिबान’

संतापजनक: वायफायचं नाव ठेवलं ‘लष्कर ए तालिबान’

Subscribe

संपूर्ण देश दहशतवादाविरोधात राग व्यक्त करत असताना, घरच्या WiFi कनेक्शनला ‘लष्कर ए तालिबान’ असं नाव देणं हे संतापजनक असल्याचं स्थानिक म्हणत आहेत.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. देशभरात विविध स्तरांतून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या तसंच जवानांच्या मनात याविषयी आधीच संताप असताना, कुणाचंही पित्त खवळेल असा एक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याणमध्ये एका वायफाय कनेक्शनला ‘लष्कर ए तालिबान’ हे दशतवादी संघटनेचं नाव देण्यात आलं आहे. सूत्रांनुसार, एका कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरूणाने निव्वळ मजा-मस्ती म्हणून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. मात्र, संपूर्ण देश दहशतवादाविरोधात राग व्यक्त करत असताना, घरच्या WiFi कनेक्शनला ‘लष्कर ए तालिबान’ असं नाव देणं हा किळसवाणा आणि संतापजनक प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये उमटत आहेत.

असली कसली गंमत?

कल्याणमधील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन कॉम्प्लेक्स हा विचीत्र प्रकार घडला आहे. या एरिआमध्ये वायफाय सर्च करताना काही रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, याप्रकरणी त्यांनी त्वरित स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यापुढे जाऊन या रहिवाशांनी या प्रकाराबाबत कॉप्लेक्समधीस अन्य रहिवाशांना याबाबत कळवले. याचा परिणाम म्हणजे काही काळ परिसरात संतापाचे आणि सोबतच भीतीचे वातावरण पसरले होते. या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वायफायचं नेटवर्क ट्रेस केलं आणि संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं. सदर २० वर्षीय तरुणाने गंमत म्हणून वायफाय कनेक्शनचं नाव  ‘लष्कर ए तालिबान’ ठेवल्याचं पोलीस चौकशीदरम्यान समोर आलं. ‘या नावात वेगळेपण जाणवलं आणि म्हणून ते नाव ठेवलं’, असं स्पष्टीकरण त्या उचापती तरुणाने दिलं. दरम्यान, हे ऐकून चक्रावलेल्या पोलिसांनी त्याला चांगलंच खडसावलं आणि पुन्हा असे प्रकर करणार नाही, अशी कबुली घेत त्याला सोडून दिलं. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर त्या तरुणाने त्वरित वायफायचं नाव बदललं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -