घरमुंबईकल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग

Subscribe

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे. कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा मोठी आग लागली. दुपारच्या सुरामारास अचानक डम्पिंग ग्राऊंडला आग लागील. या आगीमुळे आधारवाडी परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे.

उष्णतेमुळे लागली आग

गेल्या वर्षभरामध्ये कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आद लागल्याच्या घटना घडत आहेत. उष्णतेमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही आग अजून विझली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या डम्पिंग ग्राऊंडमुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या डम्पिंग ग्राऊंडवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

कायमस्वरुपी तोडगा काढावा

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्यामुळे आसपासाच्या परिसरामध्ये धुराचे साम्राज्य होते. वारंवार डम्पिंग ग्राऊंडला लागत असलेल्या आगीमुळे आधारवाडी, उंबर्डे, खडकपाडा, लालचौकी, दुर्गाडी आणि कोनगाव परिसरातल्या नागरिकांना धुरामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याची घटना घडली की ती आग लवकर विझत नाही. त्यामुळे धुराचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा – 

अंबरनाथमध्ये झाडांना आग लागण्याचे सत्र सुरुच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -