घरमुंबईकांदिवलीत आंब्याची फांदी पडली

कांदिवलीत आंब्याची फांदी पडली

Subscribe

मुंबईत एरव्ही झाडांची फांदी तुटून पडल्यावर महापालिकेला शिव्या हासडल्या जातात. परंतु शनिवारी कांदिवली एस.व्ही. रोडवरील रस्त्यालगत आंब्याच्या झाडाची फांदी पडल्यानंतर नागरीक त्या फांदीवरच तुटून पडले. या फांदीला असलेल्या कैर्‍या लुटण्यासाठी लोकांची एवढी झुंबड उडाली की त्या फांदीमुळे होणार्‍या संभाव्य अपघाताचाही विसर पडला. एवढेच नव्हेतर या फांदीमुळे बालबाल बचावलेली मुलेही सर्व विसरुन कैर्‍या तोडण्यात मश्गुल झाले.

कांदिवली एस.व्ही. रोडवरील सिग्नल शेजारी असलेल्या पदपथाशेजारी आणि उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या निवडणूक कार्यालयासमोरील आंब्याच्या झाडांची फांदी पावणे दोनच्या सुमारास अचानक तुटून पडली. ही फांदी पडली तेव्हा त्या झाडाखालून तीन ते चार लहान मुले गप्पा मारत चालले होते. परंतु झाडाची फांदी त्यांच्याशेजारी पडली. त्यामुळे मोठा संभाव्य अपघात टळला. परंतु या फांदीमुळे मुले वाचली, याकडे न पाहता फांदी तुटताच, त्याला असलेल्या कच्च्या कैर्‍या काढण्यासाठी लोकांची एकच धावपळ सुरु झाली. त्यामुळे कैर्‍या काढण्यासाठी एकच झुंबड उडाली.

- Advertisement -

एकमेकांना धक्काबुक्की करत कैर्‍या जमा करताना कोणालाही पडलेल्या फांदीची गंभीरता वाटली नाही. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर फांद्याचा कचरा असल्याने काही मिनिटातच महापालिकेच्या कामगारांनी लाकडांसह पालापाचोळा घेवून जात परिसर साफ सुफ करून टाकला.

मागील वर्षी झाडाची फांदी रिक्षावर पडून त्यामध्ये महिला प्रवाशी मृत पावली होती. तारांमुळे ही फांदी कमकुवत बनल्याने ही दुघर्टना घडली होती. कांदिवलीतील आंब्याचीही फांदीही अशाचप्रकारे कमकुवत झाल्याने तुटून पडली. याठिकाणी दुघर्टना टळली असली तरी भविष्यात अशाप्रकारच्या दुघर्टना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -