घरताज्या घडामोडीजावेद अख्तर बदनामी प्रकरणात कंगना चौकशीसाठी गैरहजर

जावेद अख्तर बदनामी प्रकरणात कंगना चौकशीसाठी गैरहजर

Subscribe

कंगनाचे वकिल रिझवान सिद्धीकी यांनी कंगना ही 15 फेब्रुवारीनंतर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे जुहू पोलिसांना कळविण्यात आले आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना राणौतला जुहू पोलिसाकडून समन्स पाठविण्यात आले होते. मात्र कंगना ही चौकशीसाठी हजर राहिली नाही. तिच्या वतीने तिचे वकिल रिझवान सिद्धीकी यांनी कंगना ही 15 फेब्रुवारीनंतर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे जुहू पोलिसांना कळविण्यात आले आहे. या वृत्ताला स्वत रिझवान सिद्धीकी यांनी दुजोरा दिला आहे. सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येनंतर कंगनाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानाची एक मालिका सुरुच होती. इतकेच नव्हे तर तिने बॉलीवूडच्या काही निर्माता-दिग्दर्शकासह कलाकारांना टार्गेट करुन त्यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती. अशाच प्रकारे तिने जावेद अख्तर यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केले होते. या घटनेनंतर जावेद अख्तर यांनी डिसेंबर महिन्यांत कंगना विरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टात एक खाजगी याचिका सादर केली होती. त्यात त्यांनी कंगणाविरुद्ध अबूनुकसानीचा दावा केला होता.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन त्याचा अहवाल 16 जानेवारीला सादर करण्याचे आदेश लोकल कोर्टाने जुहू पोलिसांना दिले होते. मात्र तपास अपूर्ण असल्याने कोर्टाने जुहू पोलिसांना 1 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. तोपर्यंत त्यांचा तपास अहवाल कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर कंगनाना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जुहू पोलिसांकडे बजाविण्यात आले आहे. मात्र शुक्रवारी कंगना ही चौकशीसाठी हजर राहिली नाही.

- Advertisement -

कंगना ही 15 फेब्रुवारीनंतर चौकशीसाठी राहणार असल्याचे तिच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासंदर्भात तिचे वकिल रिझवान सिद्धीकी यांनी सांगितले की, कंगना ही शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहिली नसली तरी ती 15 फेब्रुवारीनंतर चौकशीसाठी हजर राहिल. तशी माहिती कंगनाच्या वतीने जुहू पोलिसांना कळविण्यात आली आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीला जुहू पोलिसांकडून तशी माहिती अंधेरीतील लोकल कोर्टात सांगितली जाणार आहे.


हेही वाचा – ‘मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू?’ शरद पवारांची जयंत पाटलांवर प्रतिक्रिया!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -