घरताज्या घडामोडीकंगनाला भेटल्यानंतर तिच्या राजकीय वाटचालीबाबत रामदास आठवलेंचे संकेत!

कंगनाला भेटल्यानंतर तिच्या राजकीय वाटचालीबाबत रामदास आठवलेंचे संकेत!

Subscribe

अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातला वाद रोज नवनव्या वळणावर जात असल्याचं दिसून येत आहे. कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत बांधकामाचं कारण देत तोडकामाची कारवाई केली. मात्र, त्याविरोधात कंगनानं उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी Kangana Ranaut ची तिच्या मुंबईतल्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना Ramdas Athavle यांनी शिवसेना आणि मुंबई महानगर पालिकेवर टीका करत ‘सूड भावनेने कंगनावर टीका केली जात आहे. कंगना ड्रग्ज घेत असल्याचं चुकीचं वृत्त सामनानं दिलं. त्यामुळे सामना आणि संजय राऊत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करायला हवा’, अशी मागणी केली आहे. कंगना रनौतसोबत रामदास आठवलेंनी यावेळी जवळपास तासभर चर्चा केली. दरम्यान, यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी कंगना रनौतच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत केलेले सूचक वक्तव्य सध्या राजकीय विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

‘कंगनाला नुकसान भरपाई हवीये’

‘कंगणा रनौत यांच्याशी मी तासभर चर्चा केली आहे. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला मुंबईत घाबरण्याची आवश्यकता नाही. मुंबई सगळ्यांची आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे. मी त्यांना आश्वासन आहे की तुमच्यासोबत रिपाइं कायम असेन. त्यांनी सांगितलं माझा अपमान झाला आहे. काही थोडंफार बांधकाम जास्त झालं असेल, तर फक्त तेवढंच तोडायला हवं होतं. पण त्यांनी आतलंही तोडलं, भिंतीचं नुकसान झालंय. फर्निचरचं नुकसान झालं आहे. त्याविरोधात मी कोर्टात जाणार आहे. मुंबई पालिकेकडून मला नुकसानभरपाई मिळायला हवी. आम्ही सांगितलं तुम्हाला पालिकेनं नोटीस द्यायला हवी होती’, असं यावेळी रामदास आठवलेंनी सांगितलं. (Kangana Ranaut Mumbai Office)

- Advertisement -

ramdas athavle meets kangana ranaut

कंगनाला जाणून बुजून त्रास द्यायचं काम

दरम्यान, यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी कंगनाला मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. ‘त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचं काम केलं जात आहे. मी त्यांना आश्वासन दिलं आहे की मी मुख्यमंत्री, पालिका अधिकाऱ्यांशी याबाबत बोलेन. कंगना इथे आल्यानंतर त्यांना नोटीस द्यायला हवी होती. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी अशी कारवाई केली आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सूडभावनेनेच ही कारवाई केली गेली आहे असं माझं म्हणणं आहे. त्यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी योग्य भूमिका मांडली होती. जर असं विना पुरावा सामनाने देखील काही छापलं असेल, तर सामनावर आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील कारवाई व्हायला हवी’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

‘…तर कंगनाचं स्वागत करेन’

यावेळी रामदास आठवलेंनी कंगनाच्या पुढील राजकीय वाटचालीवर देखील भाष्य केलं. ‘मला राजकीय प्रवेश करण्यात रस नाही, असं कंगनानं सांगितलं आहे. पण जर भविष्यात ती भाजपमध्ये न जाता आरपीआयमध्ये आली, तर मी तिचं १०० टक्के स्वागत करेन. जर ती भाजपमध्ये गेली, तर ५० टक्के स्वागत करेन’, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, कंगना रनौतची आई आशा रनौत यांनी देखील यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान करून या मुद्द्यावर चर्चा सुरू करून दिली आहे. काही भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कंगनाच्या मूळ गावी हिमाचलमध्ये तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ‘आम्ही अनेक वर्ष काँग्रेससोबत राहिलो. पण आता आम्ही भाजपचे झालो आहोत’, असं विधान आशा रनौत यांनी केलं आहे. त्यामुळे कंगना रनौत पुढील काळात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -