‘आदित्य ठाकरेंचे मुव्ही माफियांसोबतचे संबंध उघड केले हाच माझा गुन्हा’; कंगनाचे नवे ट्विट

kangana ranaut share controversial memes on cm uddhav thackeray
कंगनाने पातळी सोडली, मुख्यमंत्र्यांना दिली रावणाची उपमा!

अभिनेत्री कंगना रनौत अखेर महाराष्ट्र सोडून पुन्हा मनालीला गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यात आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यातच मुंबई महापालिकेने तिचे वांद्रे येथील ऑफिसदेखील तोडले. या सर्व घटनेनंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत काही व्हिडिओ आणि ट्विटर पोस्ट शेअर केले होते. दरम्यान, तिच्या ताज्या ट्विटमध्ये तिने आमदार आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप केला असून खरे बोलण्याची शिक्षा मिळाली असल्याचे म्हटले आहे.

काय म्हटले आहे कंगनाने ट्विटमध्ये 

मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे खुनी आणि ड्रग रॅकेटचे पितळ उघड पाडलं आहे. याच लोकांसोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरेंचे संबंध आहेत. त्याबद्दल बोलणं हाच माझा सर्वांत मोठा गुन्हा आहे. त्यामुळेच ते माझ्यामागे लागले आहेत, असे ट्विट कंगनाने केले आहे.

काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज अभिनेत्री कंगना राणावत मुंबईहून मनालीला केली. बहिण रंगोलीही कंगनासोबत होती. मुंबई विमानतळावर कंगनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ४०- ५० सीआयएसएफचे जवान विमानतळावर कंगनाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र जाता जातही कंगनाने नव्या वादाला तोंड फोडलयं असच म्हणावं लागले. कारण मनालीला निघण्याआधी कंगनाने केलेले २ ट्विट पुन्हा एकदा नवीन वादाचे कारणीभूत ठरणार आहेत.

हेही वाचा –