मेट्रो कारशेड : कंगना शिवसेनेवर पुन्हा बरळली

आदित्य ठाकरे म्हणतात आरे वाचवल ! तर कंगना म्हणते नागरिकरण खोळंबल !

आरे कारशेडच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. आदित्यने आरे कारशेडच्या विषयावर दिवसरात्र काम केले अशा शब्दात त्यांच्या कामाचा गौरव मुख्यमंत्र्यांनी केला. आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी आरे कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर एक प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत मोजक्या अशा शब्दातच आदित्य ठाकरे एकुण प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे !

आरे वाचवल ! अशा मोजक्याच शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महत्वाच म्हणजे या प्रकरणात सुरूवातीपासूनच पाठपुरावा करून आदित्य ठाकरे यांनी आपला मुंबईसाठीच्या पर्यावरणाचा मुद्दा प्रामुख्याने ठळक केला होता. स्वतः आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून आरे कारशेडसाठीचे काय पर्याय असताली यासाठीच्या जागांची चाचपणी केली. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करूनच आरे कारशेडची जागा कांजुरमार्गला नेण्यामध्ये आदित्य ठाकरे यांचे महत्वाचे योगदान आहे.

काय म्हणाली कंगना रनौत ?

काही फॅन्सी पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या मुंबईच्या समस्या या फर्स्ट वर्ल्डच्या समस्या नाहीत. गेल्या वर्षी मीदेखील एक लाख रोपांची लागवड केली. वृक्ष कापण ही कधीही चांगली गोष्ट नाही. पण त्यासाठी ताकदवान आणि धनाड्य लोकांकडून नागरिकरण थांबवण हे कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही.