घरमुंबईकंगनाच्या अडचणींमध्ये वाढ; ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी

कंगनाच्या अडचणींमध्ये वाढ; ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी

Subscribe

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

वादग्रस्त विधान करुन चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. कंगनाच्या पाली हिल कार्यालयाला मुंबई महापालिकेने नोटीस दिली आहे. आता ड्रग्ज प्रकरणी कंगनाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या कंगनाविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती.

- Advertisement -

यावर विधानसभेत उत्तर देताना ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. कंगना रणौतचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते, असा खुलासा केला होता. त्यामुळे या प्रकरणाची मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -