घरताज्या घडामोडीवांद्रे पोलिसांकडून सुमारे २ तास कंगना आणि रंगोलीची चौकशी

वांद्रे पोलिसांकडून सुमारे २ तास कंगना आणि रंगोलीची चौकशी

Subscribe

कंगना चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. धार्मिक भावना दुखावल्या बद्दल कंगनाची चौकशी सुरू आहे.

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रनौत आणि तिची बहिणी रंगोली विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी आज कंगनाला आणि तिच्या बहिणीला वांद्रे पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. त्यामुळे आज कंगना बहिणीसह वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाली होती. कंगनाची आणि रंगोलीची तब्बल २ तास चौकशी सुरू होती. दुपारी १ वाजता कंगना आणि रंगोली पोलीस ठाण्यात हजर राहिली आणि ३ वाजण्याच्या सुमारास ती चौकशी संपवून पोलीस ठाण्याच्या बाहेर आली. त्यामुळे आता चौकशीनंतर कंगना आणि रंगोलीवर कोणती कारवाई केली जाणार हे येत्या काळात कळेल.

याआधीही तिना अनेकदा मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तिच्याविरोधात आलेल्या तक्रारीमुळे कंगनाला चौकशीसाठी बोलावले जात होते. मात्र कंगनाने घरगुती लग्नाचे कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी जमणार नाही असे सांगितले होते. मात्र आज शुक्रवारी कंगना चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाली. याआधीच मुंबई पोलिसांनी कंगनाला तीनवेळा समन्स बजावला होता. कंगनाने चौकशीसाठी उपस्थित राहतानाच या संदर्भातील व्हिडिओही कंगनाने शेअर केला आहे.

- Advertisement -

कंगनाच्या विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम २९४ अ आणि १५३ अ या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट मनूवर अली सय्यद यांनी कोर्टात कोर्टात अर्ज दाखल करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

 

व्हिडिओत नेमकं काय म्हणाली कंगना ? 

‘जेव्हा पासून मी देशाच्या हिताचा विचार करत आहे. तेव्हापासून माझ्यावर अत्याचार आणि माझे शोषण केले जात आहे. माझे घर तोडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी हसल्यामुळेही माझ्यावर एक केस झाली आहे. माझ्या बहिणीने कोरोनाच्या काळात डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराविरूद्ध आवाज उठवला होता त्यावरही गुन्हा दाखल केला होता. त्या केसमध्ये माझे नावही टाकण्यात आले’, असे कंगनाने व्हिडिओत सांगितले आहे. त्याचप्रमाणे ‘मला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मला कोणी सांगतच  नाहीय की मला का हजर रहायला सांगितले आहे. माझ्या सोबत सुरू असलेल्या अत्याचार कोणासोबत शेअर करू शकत नाही,असेही मला सांगण्यात आले आहे. असे अत्याचार सगळ्या जगासमोर होत आहेत. जर राष्ट्रवादी आवाज दाबले, तर हजारो वर्षाच्या गुलामीतले रक्ताचे अश्रू पुन्हा वाहू लागतील’, असे कंगनाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

कंगनावर गुन्हा दाखल केल्यानंतर तिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे कंगनाने चौकशीला जाणे टाळले होते. शेवटी पोलीसांनी कंगनाला तिसरी आणि शेवटची नोटील बजावली होती. २३ नोव्हेंबरला कंगनाला चौकशीसाठी हजर रहायला सांगितले होते. मात्र तेव्हा तिने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाकडून कंगनाला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कंगना आज वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाली. कंगना आणि तिची बहिण रंगोली रनौत चंडेल हिलाही पोलिसांनी समन्स पाठवला होता. त्यानुसार दोघीही आज वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या.

 


हेही वाचा – VIDEO: बाबो! नोरा फतेहीला करायचंय तैमूर खानशी लग्न; म्हणाली,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -