कंगनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांवर निशाणा

Kangana targets ncp leader Sharad Pawar after CM uddhav thackeray

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. मुंबईचा अवमान करणाऱ्या कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी शब्दांत उल्लेख करत अपमान केला. यानंतर आता कंगनाने आपला मोर्चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे वळवला आहे. कंगनाचा मुंबईतील खार परिसरातील डीबी ब्रीझ इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटला २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. यासंदर्भात एका पत्रकाराने ट्विट केलं होतं. यावर उत्तर देताना कंगनाने शरद पवारांकडे बोट दाखवलं. ही इमारत शरद पवारांच्या भागीदाराने बांधल्याचा दावा कंगनाने केला आहे.

कंगनाची राणौतची इमारत डीबी रियल्टी बिल्डर्सने बांधली आहे. हे शरद पवार यांचे भागीदाराने बांधली आहे. त्यामुळे ते याला उत्तर देण्यासाठी बांधील असतील, असा दावा कंगनाने केला आहे. “ती नोटीस फक्त मला नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. ते प्रकरण फक्त माझ्या फ्लॅटपुरतं नव्हे तर संपूर्ण इमारतीचं आहे. इमारात शरद पवारांशी संबंधीत असून आम्ही त्यांच्या पार्टनरकडून फ्लॅट विकत घेतला आहे. त्यामुळे मी नव्हे तर ते उत्तर देण्यासाठी बांधील आहेत, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगनाने शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांवर थेट बोट दाखवल्यामुळे मी उत्तर दिलं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. मी ३५ वर्ष पवार साहेबांसोबत आहे. मला कधी कळालं नाही की पवार साहेबांनी इमारत बांधली ते. हिला कसं कळलं काय माहिती, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांनी एक टट्विट देखील केलं आहे. “सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जीला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली.” शिवाय हॅशटॅग मानसिक रोगी देखील म्हटलं आहे.