‘या देशाच्या मुली तुम्हाला माफ करणार नाहीत’; कंगनाचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

कंगनाचं राऊतांना प्रत्युत्तर; म्हणाली “मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री कंगना रणौतचा उल्लेख ‘हरामखोर मुलगी’ असा केला. त्यांच्या यावर आता कंगनाने प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने व्हिडिओ जारी करत संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. ती म्हणाली की, तुमच्यासारख्या लोकांची मानसिकता देशातील महिलांच्या शोषणासाठी जबाबदार आहे. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणाली कंगना

मी हरामखोर मुलगी आहे असे तुम्ही म्हणालात. तुम्ही सर सरकारी यंत्रणेत काम करता, तुम्हाला हे माहितच असेल की या देशात प्रत्येक दिवशी तर प्रत्येक तासाला किती महिलांचे बलात्कार होतात, किती महिलांचे शोषण केले जाते. कामाच्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, पतींकडून पत्नींचं शोषण होते. या सर्व गोष्टींना तुमच्यासारखी मानसिकता जबाबदार आहे. या देशाच्या मुली तुम्हाला माफ करणार नाहीत. महिलांचे शोषण करणाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम तुम्ही केले. जेव्हा आमिर खान, नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले की या देशात आम्हाला सुरक्षित वाटत नाही, तेव्हा त्यांना कोणी हरामखोर म्हटले नाही. ज्या मुंबई पोलिसांचे मी आधी कौतुक करायचे, पण पालघर मॉब लिंचिंगसारखे प्रकरण घडल्यामुळे, सुशांतच्या हताश वडिलांची एफआयआर नोंदवून घ्यायला मागेपुढे केल्यामुळे मी त्यांची निंदा करते. हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संजय राऊतजी, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात. मी महाराष्ट्राची निंदा केली असे तुम्ही म्हणू शकत नाही. या देशाच्या अस्मितेसाठी अनेकांनी आपले बलिदान दिलंय, मीसुद्धा द्यायला तयार आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. भेटुयात.

कंगना रनौतने दिले संजय राऊत यांना आव्हान, म्हणाली, मुंबईत येतेय…

कंगना रनौतने दिले संजय राऊत यांना आव्हान, म्हणाली, मुंबईत येतेय…

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, September 6, 2020

 

हेही वाचा –

Youtube वरील कोरोना उपचाराचे व्हिडिओ काढण्याच्या पालिकेच्या पोलिसांना सूचना