घरमुंबईमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कांजुरमार्ग स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कांजुरमार्ग स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

Subscribe

कांजुरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांजुरमार्ग स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला असल्याकारणाने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर आता परिणाम झाला आहे. तर कुर्ला – मुलुंड दरम्यान स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले आहेत. शिवाय, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मध्य स्थानका दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -