घरमुंबई'त्या' पीडितेच्या वकिलानेच तिच्यावर हल्ल्याचा कट रचला

‘त्या’ पीडितेच्या वकिलानेच तिच्यावर हल्ल्याचा कट रचला

Subscribe

सिनेअभिनेता करणसिंह ओबेरॉय बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या वकिलाने तिच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सिनेअभिनेता करणसिंह ओबेरॉय याला पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेवर मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार वकिल अली कासिफ सादरत अली खान देशमुख (२५) याला रविवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेने या हल्ला प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून अली कासिफने या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड नसून तक्रारदार महिलेनेच स्वत:वर हा हल्ला घडवून आणल्याची कबुली दिली आहे.

अली कासिफचा जामिन मंजूर

वकिल अली कासिफने दिलेल्या कबुलीमुळे तक्रारदार महिलेची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यात तिचा सहभाग उघडकीस आल्यास तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान अटकेनंतर अली कासिफला सोमवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने पंधरा हजार रुपयांचा जामिन मंजूर केला आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत जिशान अहमद इस्तिकार अहमद अन्सारी, अल्तमस इस्तिकार अन्सारी, अरफात ऊर्फ आयबा अहमद अली खान आणि जियीन संतोष पुलीनची मुट्टील या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ज्योतिष महिलेवर बलात्कार करणाऱ्या सिनेअभिनेतेला न्यायालयीन कोठडी

काय आहे नेमकं प्रकरण?

पीडीत महिला अंधेरी परिसरात राहत असून ती ज्योतिष सांगण्याचे काम करते. तीन वर्षांपूर्वी तिची अभिनेता करणसिंगशी ओळख झाली होती. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध आले आणि त्यातून त्याने तिला नारळपाणीतून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील फोटो काढून तो तिला ब्लॅकमेल करीत होता. याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्कारासह खंडणीचा गुन्हा नोंद होताच करणसिंग याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर ही महिला प्रचंड दहशतीखाली होती. २५ मेला ती बर्‍याच दिवसांनी सकाळी वॉकसाठी गेली होती. इन्फिनिटी मॉलजवळ रिक्षातून आल्यानंतर ती कानात इअरफोन घालून वॉक करीत होती. सकाळी सव्वासहा वाजता अंधेरीतील जॉकर्स पार्क बँक रोड ओबेरॉय हायटससमोरुन जात असताना अचानक तिच्यासमोर बाईकवरुन दोन तरुण आले. त्यातील एकाने हेल्मेट तर दुसर्‍याने मास्क घातले होते. या दोघांनी तिच्या उजव्या हातावर ब्लेडसारख्या दिसणार्‍या वस्तूने वार करुन तिला मारहाण केली. तसेच तिच्यावर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती. हा प्रकार तिथे उपस्थित काही महिलांच्या लक्षात येताच त्यांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी या दोघांनी टेक द केस बॅक असे एका कागदात लिहून तेथून पलायन केले.

- Advertisement -

याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना जिशानसह इतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी अली कासिफ याच्या सांगण्यावरुन या महिलेवर हल्ला केल्याची कबुली दिली होती. अली हा पीडीत महिलेचा वकिल म्हणून काम करीत होता. त्यामुळे या गुन्ह्यांत त्याचे नाव समोर आल्याने पोलिसांना धक्काच बसला होता. रविवारी तो पोलिसांना शरण गेला. त्याच्या जबानीत त्याने हा हल्ला त्याने नव्हे तर पिडीत आणि या गुन्ह्यांतील तक्रारदार महिलेनेच घडवून आणल्याची कबुली दिली. अल्तमस अन्सारी हा अलीचा नातेवाईक असून त्याने त्याला तक्रारदार महिलेकडे पाठविले होते. यावेळी तिने तिच्यावर हल्ला करण्यास सांगितले होते. पोलीस तपासात आलेल्या या माहितीनंतर ओशिवरा पोलीस तक्रारदार महिलेची चौकशी करणार आहे. या चौकशीत तिचा सहभाग उघडकीस आल्यास तिच्यावरही अटकेची कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर अलीला सोमवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याच्या वतीने त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला होता. सायंकाळी सरकारी वकिल आणि त्याच्या वकिलाची युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अलीला पंधरा हजार रुपयांचा जामिन मंजूर केला आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -