घरमुंबईअचानक गायब झालेले कर्नाटकचे आमदार मुंबईत सापडले

अचानक गायब झालेले कर्नाटकचे आमदार मुंबईत सापडले

Subscribe

बुधवारी रात्री कर्नाटकातून अचानक गायब झालेले आमदार श्रीमंत पाटील अखेर सापडले आहेत. ते मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कर्नाटकाच्या बंगळुरु येथून अचानक गायब झालेले आमदार श्रींमत पाटील अखेर सापडले आहेत. त्यांना शोधण्यासाठी काँग्रेसने तब्बल दहा टीम नेमल्या होत्या. अखेर आज सकाळी त्यांचा शोध लागला आहे. काल रात्री आठ वाजता त्यांना बंगळुरुच्या एका रिसॉर्टमध्ये पाहण्यात आले होते. त्यानंतर ते कुठे गेल? हे कुणालाच माहिती नव्हते. त्यांचा शोध सुरु होता. दरम्यान, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार रात्री ते बंगळुरुतून मुंबईत आले. छातीत दुखत असल्यामुळे ते मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक राजकीय नाट्य; आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील गायब


कर्नाटकात राजकीय अस्थिरता

सध्या कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून कर्नाटकातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसचा आणखीन एक नेता काल रात्रीपासून कर्नाटकमधून गायब होता. बंडखोर आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान, आणखीन कोणत्या आमदाराने राजीनामा देऊ नये म्हणून काँग्रेस प्रयत्नशील आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील गायब झाल्यानंतर कर्नाटकच्या काँग्रेस गोटात मोठ्या हालचाली सुरु झाल्या. पाटील यांना शोधण्यासाठी त्यांनी चक्क दहा टीम शोधल्या या टीम्सनी त्यांना विमानतळावर देखील शोधले. मात्र, त्यांना पाटील यांचा तपास लावता आला नाही. अखेर पाटील मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -