घरमुंबईकेडीएमसी अधिकाऱ्यावर 'या' कारणांमुळे झाला हल्ला?

केडीएमसी अधिकाऱ्यावर ‘या’ कारणांमुळे झाला हल्ला?

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिकेतील कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्या हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी चार वेगवेगळया टीम तयार केल्या आहेत.

केडीएमसी कार्यकारी अधिकारी सुभाष पाटील यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन झाला हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र टेंडरचा वाद अथवा वैयक्तीक कारण यावरुनच हा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले असता, स्कायवॉकवर दबा धरुन बसलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी अचानक पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लात ते गंभीर जखमी झाले. त्यांना डोंबीवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कसा झाला हल्ला?

सुभाष पाटील हे ठाण्यात राहत असल्याने ते नेहमी लोकलनेच प्रवास करतात. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कार्यालयातून घरी जाण्यासाठी ते निघाले. पालिकेच्या शेजारीच असलेल्या डोंबिवली स्कायवॉकवरून पायी चालत रेल्वे फलाटच्या दिशेने लोकल पकडण्यासाठी जात असतानाच, स्कायवॉकवर दबा धरून बसलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी अचानक पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि ते पळून गेले. या हल्लेखोरांनी तोंडावर मास्क लावले होते. रक्ताच्या थारोळयात खाली पडलेल्या पाटील यांना त्वरीत डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील यांच्या पोटात धारदार शस्त्र घुसविण्यात आल्याने पोटाची सर्जरी केली असून, आता त्यांची तब्ब्येत ठिक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

अनोळखी हल्लखोरांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तीन ते चार अनोळखी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाटील यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. पोलिसांनी पाटील यांचा जबाब नोंदवला आहे. मात्र हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क असल्याने पाटील यांनीही हल्लेखोरांचे चेहरे पाहिलेले नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. स्कायवॉकरून हल्लेखोर पळून गेले त्यावेळी बाहेरील दुकानांच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. ते सीसीटिव्ही तपासण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाला पथकातील अधिका-यांवर यापूर्वी अनेकवेळा फेरीवाला आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून हल्ले झाले आहेत. मात्र पाटील यांच्याकडे यातील कोणत्याही विभागाची जबाबदारी नव्हती. त्यामुळे या हल्ल्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. डोंबिवली शहरासह २७ गावांचा बांधकाम विभागाचा चार्ज पाटील यांच्याकडे आहे. रस्ते ,गटारो, पायवाटा ही कामे बांधकाम विभागाकडून केली जातात. बांधकाम विभागातील एखाद्या कामाच्या टेंडरच्या वादातून हा हल्ला झाला का ? अथवा कौटूंबिक वाद कारणीभूत आहेत का? अशा विविध अंगाने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -