घरमुंबईकेडीएमसी गाळे वाटप भ्रष्टचाराचा फास आवळणार?

केडीएमसी गाळे वाटप भ्रष्टचाराचा फास आवळणार?

Subscribe

अप्पर पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावतामाळी भाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे हडपण्यात आल्याचा प्रकार कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते शंकर साळवे यांनी माहितीच्या अधिकारातून उजेडात आणल्यानंतर आता याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कल्याणच्या डीसीपींना दिले आहेत. त्यामुळे लवकरच भ्रष्टचाराचा फास आवळण्याची शक्यता निर्माण झालीय. दरम्यान या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. ‘आपलं महानगर’ने हा प्रश्न अनेकवेळा लावून धरला आहे.

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील सावतामाळी भाजी मंडईतील दिव्यांगाच्या कोटयातील गाळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने हडप केल्याचा प्रकार साळवे यांनी माहितीच्या अधिकारात उघडकीस आणला होता. या मंडईत एकूण 33 गाळे आणि 302 ओटे आहेत. त्यापैकी 8 ओटे रस्ता रूंदीकरण्यात बाधित झालेल्या अथवा विस्थापित वाटप करण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावरील बंदीस्त 33 गाळे विस्थापित महिला अंध, अपंग यांना कांदे बटाटा लसून नाशवंत नसलेली वस्तू विक्री करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मात्र हे सर्व गाळे विजय सेल्सला भाडेतत्वावर देण्यात आल्याची माहिती साळवे यांनी माहितीच्या अधिकारात उजेडात आणली होती. त्यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच महापालिकेने कल्याण स्टेशन परिसरातील रस्ता रूंदीकरणात साळवे यांची टपरी महापालिकेने तोडली मात्र अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना गाळा मंजूर करण्यात आला नाही.

- Advertisement -

त्यामुळे अनेक वर्षापासून त्यांचा प्रशासनाबरोबर लढा सुरू आहे. दिव्यांग पती पत्नी सोबत महापालिका आयुक्त उपायुकत मालमत्ता विभाग भेदभावाची वागणूक देत असल्याने त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी साळवे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी याप्रकरणाची दखल घेत कल्याणचे पोलीस उपायुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची एक पत्र त्यांनी साळवे यांनाही दिली आहे. भ्रष्टाचारासंदर्भातची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यात यावी तसेच अ‍ॅट्रोसिटीच्या संदर्भात आपल्या स्वत: अथवा आपल्या अधिनस्त अधिकार्‍यांकडून चौकशी करावी, असे आदेश पवार यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -