घरमुंबईकल्याण परिवहनचे बस स्टॉप चोरीला? पोलिसात तक्रार

कल्याण परिवहनचे बस स्टॉप चोरीला? पोलिसात तक्रार

Subscribe

चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आपल्याला वारंवार ऐकायला मिळते. त्यावर पोलीस कसे कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत, यावरही चर्चा होतात. पण कधीकधी चोरीच्या काही अजब घटना घडतात, ज्यामुळे पोलीसही अचंबित होतात. अशीच एक घटना कल्याणमध्ये घडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. केडीएमसीचा परिवहन विभाग नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतो. पण आता तर केडीएमटीचे २ बस स्टॉपच चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करत ठोस कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

नक्की झालं काय?

कल्याण न्यायालयाच्या परिसरात कल्याण-मुरबाड रोड या ठिकाणी केडीएमटीचे दोन बस थांबे होते. सकाळच्या आणि दुपारच्या वेळी या ठिकाणी भरपूर गर्दी असते. कॉलेजला जाणारे विद्यार्थी बस पकडण्यासाठी या बस स्टॉप वर थांबतात. सध्या पाउस सुरू असून बस स्टॉप नसल्यामुळे या ठिकाणी लोकांना उभं राहण्यात अडचणी येतात. हे दोन बसस्टॉप अचानक गायब झाले. कल्याण काँग्रेसचे पदाधिकारी जयदीप सानप यांनी बस स्टॉप चोरीची तक्रार कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत येणार आहे. फक्त दोन बस स्टॉप काढून कोणता विकास करायचा आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बस स्टॉपच्या नावाखाली केडीएमटीमध्ये भ्रष्टाचार सुरु आहे का? असा देखील प्रश्न चर्चिला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, याविषयी विचारणा केली असता, ‘स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने हे बस स्टॉप काढण्यात आले आहेत’, असा अजब दावा केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी यांनी केला आहे. तर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी मात्र, ‘या प्रकरणी पाहणी करून चौकशी करण्यात येणार असल्याचे’ सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -