घरमुंबईकेडीएमसीत मनसे, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी

केडीएमसीत मनसे, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी

Subscribe

महापौरांच्या निर्णायक मतामुळे भाजपचा उमेदवार विजयी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यपदाच्या सहा जागांसाठी पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपचे प्रत्येकी तीन असे सहाही उमेदवार निवडून आले. भाजप व मनसेच्या उमेदवाराला समसमान मते मिळाल्याने महापौरांनी आपले निर्णायक मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकले. त्यामुळे मनसेला पराभव पत्करावा लागला. मात्र एकिकडे आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत मनसेला घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे केडीएमसीच्या परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत हे प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे परिवहनच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींचे संकेत …हे शुक्रवारी आपलं महानगरने दिलेले वृत्त तंतोतंत खरं ठरलं.

परिवहनच्या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी महापौर विनिता राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. परिवहन समितीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने सेना-भाजपा युती व मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत सहाव्या जागेसाठी चांगलीच रंगत आली होती. यावेळी शिवसेनेचे सुनील खारूक 112 मते , अनिल पिंगळे 97 मते , बंडू पाटील 106 मते, भाजपचे संजय मोरे 108 मते , स्वप्निल काठे 105 मते, दिनेश गोर 96 मते तर मनसेचे मिलिंद म्हात्रे यांनाही 96 मते मिळाली. भाजपचे गोर आणि मनसेचे म्हात्रे या दोघांनाही समसमान 96 मते मिळाल्याने मनसेने फेरमोजणीची मागणी केली. फेरमोजणी केल्यानंतरही मतांमध्ये काहीच बदल झाला नाही. दोन्ही उमेदवाराला समसमान मते मिळाल्यास महापालिका अधिनियमाच्या 2 अ 19 कलमाचा वापर करीत निर्णायक मते देण्याचा अधिकार महापौरांना असतो. या अधिकाराचा वापर करीत महापौर राणे यांनी निर्णायक मत हे भाजपचे उमेदवार दिनेश गोर यांच्या पारडयात टाकले. त्यामुळे सहावे उमेदवार गोर हे विजयी घोषीत करण्यात आले. या निवडणुकीत 120 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -