घरमुंबईकेम्प्स कॉर्नर उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला; पालिकेची माहिती

केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी खुला; पालिकेची माहिती

Subscribe

गेल्या महिन्यात न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्ग येथील मार्गाच्या बाजूला ‘मलबार हिल’ परिसरातील टेकडीचे भूस्खलन (Landslide) झाले. त्यानंतर, महापालिकेने या भूस्खलन झालेल्या भागाची पुनर्बांधणी करण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामासाठी आयआयटी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तज्ज्ञ समिती देखील नेमण्यात आली. या अनुषंगाने सदर रस्त्याची, पुलाची व तेथे सुरु असलेल्या कामांची संयुक्त पाहणी ही अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, पोलीस अप्पर आयुक्त (वाहतूक) पडवळ, महापालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे यांनी आज, मंगळवारी केली. या पाहणी दरम्यान संबंधित तज्ज्ञांशी तसेच अभियंत्यांशी चर्चा करुन अधिक सुलभ वाहतूकीच्या दृष्टीने केम्प्स कॉर्नर उड्डाणपुल येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे निर्देश संबंधिताना दिले आहेत. तसेच यासाठी या उड्डाणूपलाचे आवश्यक ते दुरुस्तीकरण करुन व उड्डाणपुलावरील रस्त्याचे तातडीने नुतनीकरण करुन हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या पूल खात्याद्वारे देण्यात आली आहे.

या कामाच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीमध्ये ख्यातनाम संरचनात्मक सल्लागारांसह भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचाही समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली आहे. तांत्रिक तज्ज्ञ समितीने व तांत्रिक सल्लागार यांनी सादर केलेली संकल्प चित्रे व निविदा सूचना प्रकाशित झालेल्या आहेत. निविदा प्रक्रियेअंती डिसेंबर २०२० मध्ये ‘मलबार हिल’ परिसरातील या टेकडीची पुनर्बांधणी व भूस्खलानामुळे प्रभावित झालेल्या न्यायमूर्ती सीतारात पाटकर रस्त्याची पुनर्बांधणी ही कामे सुरु होण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहितीही पालिकेकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

राज्यापालांची पत्रातील भाषा योग्य नाही; ‘त्या’ पत्रावर शरद पवार नाराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -