घरमुंबई२१ वर्षांच्या तरुणाचा अपहरणाचा प्रयत्न फसला

२१ वर्षांच्या तरुणाचा अपहरणाचा प्रयत्न फसला

Subscribe

मुंबईतील क्राईमसंबंधी बातम्या वाचा थोडक्यात...

पार्टीवरुन घरी जाणार्‍या एका 21 वर्षांच्या तरुणाचा अपहरणाचा असफल प्रयत्न करण्यात आला. त्या तरुणावर तिघांनी ब्लेडने प्राणघातक हल्लाही केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या केतन शशिकांत आरेकर याच्यावर रेहजा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा पोलीस शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले. ही घटना शुक्रवारी सकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास माहीम येथील एस. एल रहेजा रोडवरील शितलादेवी मरियम्मा मंदिर व बेस्ट इलेक्ट्रीक पोलदरम्यान घडली. केतन आरेकर हा तरुण याच परिसरातील न्यू पोलीस कॉलनीत राहतो. त्याचे वडिल शशिकांत आरेकर हे पोलीस दलात कार्यरत असून सध्या त्यांची नेमणूक गुप्तचर विभागात आहे.

शुक्रवारी केतन हा त्याच्या मित्रांसोबत अंधेरीतील किट्टी लू पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टी संपल्यानंतर त्याचे मित्र घरी गेले. सकाळी पाच वाजता तो त्याच्या घरी जाण्यासाठी टॅक्सीतून माहीम परिसरात आला. यावेळी स्कूटरवरुन आलेल्या तीन तरुणांनी शितलादेवी मरियम्मा मंदिराजवळ टॅक्सीला ओव्हरटेक केले. त्याला टॅक्सीतून उतरुन गाडीत बसण्याचा प्रयत्न केला, त्याने विरोध केल्यानंतर या तिघांनी त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले होते. त्यात केतन हा गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर तिन्ही मारेकरी स्कूटरवरुन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या केतनला पोलिसांनी तातडीने रहेजा रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले असून त्याला उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध माहीम पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. तिन्ही आरोपी गर्दुल्ले असावे असा संशय व्यक्त होत आहे.

- Advertisement -

 

घातक शस्त्रांच्या विक्रीप्रकरणी तरुणाला अटक

मुंबई | मानखुर्द परिसरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. समर ऊर्फ बबलू ऊर्फ समीर मोहम्मद सईद खान असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन आणि तीन राऊंड हस्तगत केले आहे. जप्त केलेले पिस्तूल गोवंडी परिसरातून चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.  घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानखुर्द परिसरात काही तरुण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने लल्लूभाई पार्क, देवनार कॉलनी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे समीर खान हा तरुण आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक पिस्तूल, दोन मॅगझीन आणि तीन राऊंड सापडले.

- Advertisement -

 


दहा टक्के व्याजदराच्या आमिषाने अनेकांची फसवणुक

मुंबई | दहा टक्के व्याजदराच्या आमिषाने अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत या टोळीने बाराशे लोकांकडून सुमारे 32 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या कंपनीच्या दोन बड्या अधिकार्‍यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. सुमीत कैलास शर्मा ऊर्फ निहाल ऊर्फ अख्तर खान आणि सुमाईल समीर खान ऊर्फ समीर अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने सतरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही टोळी दिड हजार कोटी रुपये घेऊन पलायन करणार होती अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. सुमाईल आणि सुमीत हे दोघेही मूळचे जयपूरचे रहिवाशी आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी साकिनाका परिसरात क्युरकी टेक्नोलॉर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीत गुंतवणुक केल्यास गुंतवणुकदारांना महिन्यांला गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दहा टक्के कमिशन मिळेल असे आकर्षक योजना सुरु केली होती. कंपनीत सुमाईल हा उपाध्यक्ष तर सुमीत सीईओ म्हणून काम करीत होते. याकामासाठी त्यांनी काही तरुणांची भरती सुरु केली होती. साकिनाका आणि वाशी येथे देान कार्यालय सुरु केल्यानंतर त्यांनी दहावी आणि बारावी पास असलेल्या बेरोजगार तरुणांना हाताशी धरुन कामावर ठेवले. या सर्वांना वीस ते पंचवीस हजार रुपये पगार दिले होते. सर्वांना टार्गेट देऊन प्रमोशनचे गाजर दाखविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर गुंतवणुक करणार्‍या कर्मचार्‍यांना पगाराव्यतिरिक्त अधिक भत्ता देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -