खार रॉबरीप्रकरणी सहा आरोपींच्या कोठडीत वाढ

Mumbai
Arrested Photo
प्रातिनीधीक फोटो

खार येथील 62 लाख रुपयांच्या रॉबरीच्या गुन्ह्यांतील सहाही आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या आरोपींना बुधवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांना आणखीन तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान चोरीच्या गुन्ह्यांतील आणखीन काही कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. 5 सप्टेंबरला खार येथे राहणार्‍या कोहीनूर नादीरअली सय्यद या महिलेच्या घरात तिघांनी कुरिअर देण्याच्या बहाण्याने प्रवेश करुन रॉबरी केली होती.

या तिघांनी घातक शस्त्रांच्या धाकावर 60 लाख रुपयांची कॅश, 1 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपयांचा एक मोबाईल असा सुमारे 62 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यासाठी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यात मोहम्मद वारीश मोहम्मद आरिफ शेख, मोहम्मद अक्रम अब्दुल समर इंद्रीसी, सुजीतकुमार जयवंत ठाकूर, मोहम्मद सोहेल मुनेद्दीन अन्सारी, मंजुर अब्दुल अहमद शेख ऊर्फ कालिया आणि रफिकअली कुतुबअली मोहम्मद अक्रम इसाक सिद्धीकी ऊर्फ पतलू यांचा समावेश आहे.

सहाही आरोपी पोलिसांना सहकार्य करत नसून रॉबरीचा मुद्देमाल कुठे ठेवला होता, कोणाला दिला आहे, त्यांचे इतर साथीदार कोण आहे याबाबत पोलिसांची सतत दिशाभूल करत आहेत. त्यामुळे पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना बुधवारी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना आणखीन तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत पोलिसांनी सुमारे सोळा लाख रुपयांची कॅश, पाच ते सहा मोबाईल, तीन सोन्याच्या बांगड्या आदी मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित कॅश लवकरच जप्त केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान वशीर अली अहमद या आरोपीला वॉन्टेड घोषित करण्यात आले असूनत्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here