खारघर मधील एका कोचिंग क्लासेसच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांनी तेथील कर्मचारी तरुणीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. या घटनेतील पीडितेने कुटुंबीयांच्या मदतीने खारघर पोलिसांत बलात्काराची तक्रार नोंदवली आहे.
फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध
खारघरमधील एका नामांकित खाजगी क्लासमध्ये ही घटना घडली आहे. क्लासमध्ये सुपरवायझरचं काम करणाऱ्या तरुणीवर शिक्षकाने अतिप्रसंग केल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. धक्कादायक म्हणजे आठ दिवसांनंतर तेथील दुसऱ्या शिक्षकानेही पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. घरच्या परिस्थितीमुळे पीडितेने तक्रार केली नाही. पण त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने खारघर पोलीस स्थानकात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर दोन्ही शिक्षक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.