खारघरवासी मॅरेथॉनमध्ये; धाव.. धाव.. धावले…!

११ व्या मॅरेथॉन स्पर्धेत घेतली स्वच्छतेची शपथ

Mumbai
Kharghar Mararthon

आरोग्य आणि तंदुरुस्तीची समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा ‘हम फिट तो इंडिया फिट’ ही संकल्पना घेऊन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या वतीने खारघरमध्ये रविवार, १३ जानेवारी रोजी झालेल्या ११ व्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटातील स्पर्धेत मुंबईच्या योगेंद्र कुमारने तर महिलांच्या खुल्या गटात पुण्याच्या जनाबाई हिरवे यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. सुविधांची चोख सेवा, उत्कृष्ट आणि सुनियोजनात झालेल्या या मॅरॅथॉनमध्ये १६ हजारहून अधिक म्हणजेच अपेक्षा पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन तुफान प्रतिसाद देत ही खारघर महामॅरेथॉन केली.

विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींनी स्पर्धेची वाहवा करतानाच आम्ही खारघर मॅरेथॉनच्या प्रेमात पडलो आहोत, अशी पावतीही दिली. यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. विविध गटातील स्पर्धा पार पडत असतानाच हावरे विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ’हम भी किसिसे कम नही’ हे दाखवून देत स्पर्धकांमध्ये चैतन्य पसरविले. त्यांना उपस्थित क्रीडारसिकांनी दाद देऊन त्यांचे कौतुक केले तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कारही केला. तसेच विविध सामाजिक संदेश घेऊन खारघर मधील सोसायट्या या स्पर्धेत धावल्या. यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप तिदार यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन १० कि.मी.ची स्पर्धा पू्र्ण करत फिटनेस मंत्र दिला. त्याचबरोबर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी सतत मेहनत घेणारे स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, मिस्टर युनिव्हर्स जगजेता शरीरोष्ठवपटू संग्राम चौगुले, सिने अभिनेत्री मोनालिसा बागल, एफएम आरजे अर्चना, आरजे सलील, मिसेस इंडिया अर्थ किरण राजपूत, यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पॅराडाईज ग्रुपचे मनीष भतीजा, महापालिकेचे सभागृह नेते आणि मॅरेथॉनचे प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अ सभापती अभिमन्यू पाटील, रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्या राज अलोनी, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here