अपहरण झालेली चिमुरडी सापडली रेल्वे स्टेशनवर

भिवंडीमध्ये सायंकाळी शाळेतून परतणाऱ्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. मात्र, ही चिमुरडी दुसऱ्या दिवशी सकाळी भिवंडी रोड रेल्वेस्टेशन परिसरात सुखरूप आढळली आहे. तसेच अपहरकर्त्याचा गांभीर्याने तपास पोलीस करत आहेत.

Mumbai
kidnapped Small girl found on railway station
अपहरण झालेली चिमुरडी सापडली रेल्वेस्टेशनवर

भिवंडी शहरातील कामतघर, हनुमान नगर येथील शाळा क्र.३१ च्या प्रवेशद्वारावरून सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘तुला आंबे खायला देतो’, असे सांगितले आणि तिला आपल्या सोबत घेऊन जात तिचे अपहरण केल्याची घटना काल दि. १८च्या सायंकाळी घडल्याचे समोर येत आहे. ही घटना घडल्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंजू संजय सिंग (वय ६) असे अपहरण झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

सदर चिमुरडी सायंकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर अन्य दोन मैत्रिणींसह घरी जाण्यासाठी निघाली असता शाळेच्या प्रवेशद्वारावरच एका अनोळखी इसमाने त्या मुलींना आंब्याच्या झाडाखाली आंबे खायला देतो, असा अमिष दाखवीत आपल्या सोबत येण्यास सांगितले. त्या तिघींना ताडाळी पाईपलाईनच्या दिशेने घेऊन जात असतानाच यातील दोन मुली रस्त्यातूनच माघारी फिरून आपापल्या घरी निघून गेल्या. त्यापैकी मंजू ही रात्री उशिरा पर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली परंतु ती कोठेही सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या हरविल्याची नोंद केली. पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दाखल घेत रात्री पासूनच तपास सुरु केला. तपास सूरु असून पण ती कोठेही सापडत नव्हती. मात्र, एका अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळीस मंजूला भिवंडी रोड रेल्वे स्टेशन येथे सोडून पळून गेला. त्यामुळे मंजू रात्रभर रेल्वे स्टेशन परिसरातच झोपी गेली. सकाळी उठल्यावर तिने एका मंडल नामक प्रवाश्याला मला घरी जायचे आहे, असे सांगितल्याने त्याने तिला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानिक नारपोली पोलीस ठाण्याशी संपर्क करून मंजूची माहिती दिली. या घटनेबाबत बिनतारी संदेशाने सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आल्याने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात एका सहा वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनीफ शेख यांनी मुलीच्या पालकांना सोबत घेऊन नारपोली पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचा ताबा घेऊन तिला आईवडिलांच्या हवाली केले आहे.

सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू

या घटनेनंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी सकाळ पासून शाळे पासून ताडाळी पाईपलाईन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये या मुली सोबत एक अनोळखी इसम दिसत असून पोलीस अपहरणकर्त्याचा कसून शोध घेत आहेत. अपहरण झालेल्या मनू सोबतच तिच्या मैत्रिणींकडून अपहरणकर्त्या बाबत आणि त्याच्या हेतू बाबत जाणून घेण्यासाठी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी या मुलीसोबतच तिच्या मैत्रिणींसह पालकांकडे कसून चौकशी सुरु केली आहे. ताडाळी कामतघर परिसरात सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस गांभीर्याने या गुन्हेगाराचा तपासास लावत आहेत .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here