घरमुंबईमुलीच्या अपहरणाने कुर्ल्यात खळबळ

मुलीच्या अपहरणाने कुर्ल्यात खळबळ

Subscribe

कुर्ला येथून एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर जबदस्तीचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत सतरा वर्षांच्या आरोपी तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या आरोपीला यापूर्वी जानेवारी महिन्यांत सामूहिक बलात्कारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. दिड महिन्यांपूर्वीच तो बालसुधारगृहात बाहेर आला आणि त्याने बुधवारी अन्य एका मुलीचे अपहरण करुन तिच्यावर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या मुलीला मेडीकलसाठी पाठविण्यात आले असून तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला आहे की नाही हे मेडीकल रिपोर्टनंतर उघडकीस येईल असे पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांनी सांगितले. बुधवारी कुर्ला येथील विनोबा भावे नगर परिसरातून एका अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. याप्रकरणी त्याच्या पालकांनी विनोबा भावे नगर पोलिसांत तक्रार केली होती.

याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील मनिष श्रीधनकर, संतोष मस्तुद, निधी धुमाळ, महेंद्र कालुष्टे, मुरलीधर सपकाळे, दिपक खरे, गणेश पाटील यांनी काही तासांत घाटकोपर येथील एलबीएस रोडवर, सर्वोदय हॉस्पिटलजवळील एका झोपडीतून आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. चौकशीत त्याने या मुलीवर झोपडीमध्येच जबदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तिला मेडीकलसाठी पाठविण्यात आले आहे. मेडीकलनंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला आहे की नाही याचा उलघडा होईल. तसा रिपोर्ट आल्यास त्याच्याविरुद्ध अपहरणासह बलात्कार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान आरोपी हा सतरा वर्षांचा असून त्याला यापूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत अटक केली. त्याने व त्याच्या एका मित्राने एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते, दिड महिन्यांपूर्वीच त्याची बालसुधारगृहात सुटका झाली होती. त्यानंतर त्याने पिडीत मुलीचे अपहरण करुन तिच्यावर जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी विनोबा भावे नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -