घरमुंबईगेल्या १० वर्षांत ६१६ मूत्रपिंड दान!

गेल्या १० वर्षांत ६१६ मूत्रपिंड दान!

Subscribe

गेल्या १० वर्षांत एकूण ६१६ मूत्रपिंड दान झाले असून ३९३ व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहेत.

गेल्या १० वर्षांच्या तुलनेत मुंबईत सध्या अवयवदानाबाबत जनजागृती वाढत आहे. झेडटीसीसी अर्थात झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत तब्बल ३९३ व्यक्तींचे अवयव दान करण्यात आले आहेत. २००९ ते २०१९ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंतची ही आकडेवारी आहे. ज्यात ६१६ मूत्रपिंडांचे अर्थात किडनीचे दान करण्यात आले आहे. अवयवदानाच्या वाढत्या प्रतिक्षायादीमुळे अनेक गरजू रुग्णांना आजही अवयव उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही बरीच आहे. दरवर्षी किमान ५ लाख लोकांचा अवयव न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. त्यामुळे, होणारी मागणी आणि उपलब्धता यामध्ये बरीच तफावत आहे.


हेही वाचा – अवयवदानासाठी आता वेबसाईटची होणार मदत!

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अवयवदान केल्यावर किंवा अवयव प्रत्यारोपित झाल्यावर अनेक बदल होतात. वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला एक बीएसएफ जवान स्क्लेरोसिंग कोलेन्जायटिसमुळे त्रस्त होता. ज्यामुळे, त्याचे यकृत निकामी झाले. त्याच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आणि त्याचे प्राण वाचले. आता हा जवान सुरळीत आयुष्य जगत असून पुन्हा मायभूमीची सेवा करत आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत.

- Advertisement -

मुंबईत ५३ दाते!

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विभाग प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकुर गर्ग यांनी सांगितलं की, “मुंबईत आत्तापर्यंत (८ ऑगस्ट २०१९ पर्यंत) ५३ दाते मिळाले असून झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरनुसार, अवयव दानाची गती मुंबईने कायम राखली आहे. अवयवदानाच्या अनुषंगाने अव्वल पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राची गणना होण्यासाठी मुंबईने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.”

तज्ज्ञांच्या मते, एक ब्रेनडेड व्यक्ती एका वेळीस ८ जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे, अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच वेळी या चांगल्या हेतूसाठी सरकार आणि आरोग्य सेवांनी पुढाकार घेणे देखील आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -