धक्कादायक! पैशासाठी पुतण्यानेच केली काकीची हत्या

minor boy murder his brother because he is not allow him to play pubg game
क्राईम

लॉकडाऊनमध्ये कामधंदा नसल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या २२ वर्षीय पुतण्यानेच काकीची हत्या करून घरातील दागदागिने असा एकूण पावणे सहा लाख रुपयाचा ऐवज चोरी करून पोबारा केला होता. मात्र पळून जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या पुतण्याचे काही तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.

जरीना अन्वर शेख (वय ६०)असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. जरीना या कुर्ला पूर्व जागृती नगर येथील अन्वर पवार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एकट्याच राहत होत्या. रविवारी रात्री त्यांची मुलगी ८ वाजता जेवण देण्यासाठी गेली होती, त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा मुलगी जेवणाचे ताट घेण्यासाठी आईकडे गेली असता घराला बाहेरून कुलूप लावले होते. मुलीने तिच्याकडील चावीने कुलूप उघडुन घरात प्रवेश केला असता घरात आई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली होती आणि घरातील कपाटातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या होत्या.

या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णलायत पाठवण्यात आला. जरीना शेख हिच्या घरातून सुमारे १९ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून या दागिन्यांची किंमत ५ लाख ७० हजार असल्याची माहिती पोलिसानी दिली. पोलिसांनी मारेकऱ्याच्या शोधासाठी इमारतीत असलेले सीसीटीव्ही तपासले असता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून काही संशियितांची चौकशी केली असता त्यात एक जण मृत महिला जरीनाचा पुतण्या इरफान निसार शेख (वय २२) हा असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचाकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत पैसासाठी काकीची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

इरफान हा घाटकोपर पश्चिम चिराग नगर परिसरात पत्नी सोबत राहण्यास होता. लॉकडाऊनमध्ये काहीही कामधंदा नसल्यमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या इरफानने कुर्ला पूर्व जागृती नगर येथे राहणाऱ्या काकीकडे भरपूर पैसे असल्याचे माहिती होते व सध्या ती घरीच एकटीच राहत असल्यामुले त्यांने काकीचे पैसे चोरण्याचा कट रचला होता. रविवारी रात्री सडे आठ वाजण्याच्या सुमारास इरफान हा जरीना हिच्या घरी आला व त्याने तिच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने सोबत आणलेल्या चाकूने काकी जरीना हिच्यावर वार करून तिला ठार मारून कपाटात मिळाले तेवढे दागिने घेऊन पोबारा केला होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीसानी इरफानला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

हेही वाचा –