घरमुंबईतृतीयपंथीयांना स्थानिक नागरिकांकडून जबर मारहाण

तृतीयपंथीयांना स्थानिक नागरिकांकडून जबर मारहाण

Subscribe

भाईंदरमध्ये दिवाळी मागण्यासाठी गेलेल्या तीन तृतीयपंथींना स्थानिकांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर केल्याचा केला आरोप.

दिवाळी सणानिम्मीत्त पैसे मागायला गेलेल्या तृतीयरंथींना भाईंदर येथील स्थानिक रहिवाशांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. भीक मागण्यासाठी गेलेल्या तीन तृतीयपंथींना मारहाण करण्यात आली. झालेल्या घटनेमध्ये एक स्थानिक महिलाही जखमी झाली आहे. दोन्ही पक्षांनी भाईंदर पोलिसांकडे एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. मात्र घटनेदरम्यान पोलीस घटनास्थळाजवळच असल्याचे तृतीयपंथीयांनी सांगितले आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यास त्यांनी कारवाई करण्यासही वेळ लावला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कशी घडली घटना

मालाड येथील मालवनी परिसरातील तीन तृतीयपंथी भाईंदर येथे दिवाळी निम्मीत्त भीक मागण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील भाईंदर येथील बालाजीनगर परिसरात हे किन्नर जमले होते. यापरिसरातील दुकांदाराकडून दिवाळी निमीत्त  पैसे मागत होते. यावेळी एका दुकानातील महिलेशी पैशावरुन त्यांचा वाद झाला. या महिलेनी ११ रुपये या किन्नरांना दिले. मात्र त्यांनी अधिक रकमेची मागणी केली. यामुळे झालेल्या वादातून तृतीयपंथीयांची येथील स्थानिकांबरोबर बाचाबाची झाली. स्थानिकांच्या जमावाने या तीघांना बेदम मारले. दरम्यान तृतीयपथींनी घटनास्थळावरून पळ काढला.

- Advertisement -

स्थानिक पोलीसांकडे तक्रार दाखल

तृतीयपंथींनी जखमी अवस्थेत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तृतीयपंथ्यांना बेदम मारहाण केल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या घटनेचा तृतीयपंथी संघटनांनी विरोध केला आहे. उशीरा रात्री संघटनेतील काही किन्नरांनी स्थानिक पोलिसांकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -