महापौरांनी SRA चा फ्लॅट बळकावला, किरीट सोमय्यांचा पुराव्यांनिशी गंभीर आरोप!

Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Positive

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोना झाल्यामुळे सध्या होम क्वारंटाईन झाल्या आहेत. मात्र, त्या क्वारंटाईन झाल्यानंतर त्यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. गुरुवारी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजपकडून महानगर पालिकेत अविश्वासाचा ठराव मांडून त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ Kangana Ranaut च्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने (BMC) कारवाई केल्यानंतर महानगरपालिका टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यातच आता भाजपनं आपला शिवसेना विरोध अधिक तीव्र करताना थेट मुंबईच्या महापौरांवरच फ्लॅट लाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माजी खासदार आणि मुंबईतील नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी सकाळीच ट्वीट करून काही कागदपत्र त्यात पोस्ट केली आहेत. SRA च्या वरळीतील संकुलातला फ्लॅट आणि गाळा महापौरांनी बळकावल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

कुठल्या फ्लॅटबद्दल केला आरोप?

मुंबईच्या वरळी भागात SRA कडून गोमाता सोसायटी बांधण्यात आली आहे. यातल्या बिल्डिंग नं. १ मध्ये गाळा (Kis Corporate Servises) आणि बिल्डिंग नं. २मध्ये फ्लॅटचा उल्लेख असलेली कागदपत्र किरीट सोमय्यांनी ट्वीट केली आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हा फ्लॅट एका व्यक्तीला देण्यात आला होता. शिवाय, बाजूच्या इमारतीतला गाळा देखील गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला त्यांच्या ऑफिससाठी देण्यात आला होता. सध्या हा प्रकल्प मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात आहे, असं सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.