घरमुंबईकिसान मोर्चा अखेर स्थगित, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश!

किसान मोर्चा अखेर स्थगित, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश!

Subscribe

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे निघालेला किसान मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून आंदोलकांची समजूत काढल्यानंतर हा मार्च स्थगित करण्यात आला. दरम्यान, सरकारकडून आंदोलकांना लेखी आश्वासन देखील देण्यात आलं आहे.

शेतकरी बांधवांच्या मागण्या घेऊन नाशिकमधून निघालेला किसान लाँग मार्च अखेर स्थगित झाला आहे. यावेळीही गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली आहे. आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचं लेखी आश्वासन सरकारकडून गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत गिरीश महाजन आणि आंदोलकांमध्ये बैठक सुरू होती. ‘ही बैठक यशस्वी ठरल्याचं’ गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

‘वनहक्क जमिनींचे दावे निकाली काढणार’

दरम्यान, या बैठकीमध्ये वनहक्क जमिनीचे दावे येत्या ३ महिन्यांमध्ये निकाली काढणार असल्याचं आश्वासन सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाने शेतकऱ्यांचं समाधान झाल्याचंही गिरीष महाजन यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबईत येणारा मोर्चा नाशिकमध्येच थोपवण्यात महाजन यांना यश आलं आहे. दरम्यान, या आश्वासनांसंदर्भात येत्या २ महिन्यांमध्ये आढावा बैठक घेणार असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिलेली काही आश्वासने

  • निराधारांचे पेन्शन वाढवणार
  • पॉलिहाऊस शेड शेतकऱ्यांना दिलासा देणार
  • परभणीतील विमा योजनेतील वंचित शेतकऱ्यांना न्याय देणार
  • वनाधिकार, दुष्काळ, रेशन, सिंचन प्रश्नांवरील लेखी मागण्या मान्य
  • देवस्थान जमिनीसाठी कायदा करणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -